TRENDING:

बॉयफ्रेंडला 'Love Bites' दिसू नयेत म्हणून 22 वर्षीय विद्यार्थिनीकडून धक्कादायक प्रकार; CCTV फुटेज पाहताच पोलिस चक्रावले

Last Updated:
Bengaluru News: बेंगळुरूमध्ये सामूहिक बलात्काराच्या तक्रारीत मोठा 'ट्विस्ट' समोर आला आहे. बॉयफ्रेंडला 'लव बाइट्स' दिसू नयेत म्हणून नर्सिंग विद्यार्थिनीने कॅब चालकावर खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली दिली आहे.
advertisement
1/8
बॉयफ्रेंडला 'Love Bites' दिसू नयेत म्हणून विद्यार्थिनीकडून धक्कादायक प्रकार
बेंगळुरूमधील एका गंभीर प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीने कॅब चालक आणि त्याच्या साथीदारांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा केलेला आरोप खोटा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सअॅप चॅट्सच्या आधारे हा प्रकार परस्पर संमतीने झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
2/8
ही विद्यार्थिनी एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती मूळची केरळची आहे. तिने 6 डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने सांगितले होते की 2 डिसेंबरच्या रात्री सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलजवळ कॅबमध्ये तिच्यावर कॅब चालक आणि त्याच्या काही मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि अधिकार क्षेत्रामुळे प्रकरण बनसवाडी पोलीस ठाण्यात वर्ग केले.
advertisement
3/8
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूर्व बेंगळुरूमधील कॅब चालकाला त्याच्या घरी जाऊन अटक केली. हा चालक 33 वर्षांचा असून त्याला दोन मुले आहेत आणि त्याची पत्नी गृहिणी आहे. आरोप ऐकून तो पूर्णपणे हादरला होता आणि सुरुवातीपासूनच आपण निर्दोष असल्याचा दावा तो करत होता.
advertisement
4/8
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये 2 डिसेंबर रात्री 11.30 ते 3 डिसेंबर पहाटे 5.30 या वेळेत ही विद्यार्थिनी आणि कॅब चालक दोघेही एकत्र रेल्वे स्टेशन परिसरात फिरताना दिसून आले. दोघे कधी कॅबमधून उतरून चालताना, तर कधी पुन्हा कॅबमध्ये बसताना दिसले. अखेरीस पहाटे 5.30 नंतर ती एर्नाकुलमला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसताना फुटेजमध्ये दिसते. विशेष म्हणजे तिने सांगितलेल्या इतर कथित आरोपींचा कुठेही मागमूस पोलिसांना सापडला नाही.
advertisement
5/8
पोलिसांनी कॅब चालकाचे व्हॉट्सअॅप संदेशही तपासले. त्यात 3 डिसेंबरनंतर विद्यार्थिनीने चालकाला अनेक संदेश पाठवले असल्याचे आढळले. या संदेशांमधून दोघांमधील संभाषण मैत्रीपूर्ण होते आणि घटनेनंतरही त्यांच्यात चांगले संबंध असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थिनीला पुन्हा चौकशीसाठी बोलावले.
advertisement
6/8
सखोल चौकशीत विद्यार्थिनीने अखेर कबुली दिली की तिने खोटी तक्रार दाखल केली होती. कॅबमध्ये असताना तिच्या मानेवर लव बाइट पडले होते. हे लव बाइट पाहून तिच्या बॉयफ्रेंडने प्रश्न विचारू नयेत, म्हणून तिने बलात्काराची खोटी कथा तयार केल्याचे तिने मान्य केले.
advertisement
7/8
कॅब चालकाच्या म्हणण्यानुसार, तो आणि ही विद्यार्थिनी दोघेही केरळचे असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्या रात्री त्याने तिला रेल्वे स्टेशनवर सोडले होते. कॅबमध्ये बसल्यानंतर विद्यार्थिनीने एर्नाकुलममध्ये असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून आपण पहाटेची ट्रेन पकडणार असल्याचेही सांगितले होते.
advertisement
8/8
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, कॅब चालक पोलिस कोठडीत आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण प्रकरणामुळे खोट्या तक्रारींच्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
बॉयफ्रेंडला 'Love Bites' दिसू नयेत म्हणून 22 वर्षीय विद्यार्थिनीकडून धक्कादायक प्रकार; CCTV फुटेज पाहताच पोलिस चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल