TRENDING:

Vaibhav Suryavanshi : रेकॉर्ड करूनही वैभव सूर्यवंशीचा हार्टब्रेक,काही तासात पाकिस्तानी खेळाडूने मोडला विक्रम

Last Updated:
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आज भारताच्या 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची वादळी खेळी करून मोठा रेकॉर्ड केला होता. मात्र हा रेकॉर्ड आता काही तासातच तुटला आहे.
advertisement
1/7
रेकॉर्ड करूनही वैभव सूर्यवंशीचा हार्टब्रेक,काही तासात दुसऱ्या खेळाडूने मोडला विक
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आज भारताच्या 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची वादळी खेळी करून मोठा रेकॉर्ड केला होता. मात्र हा रेकॉर्ड आता काही तासातच तुटला आहे.
advertisement
2/7
युएईविरूद्ध खेळताना वैभव सूर्यवंशीने 14 षटकारांच्या मदतीने 95 बॉलमध्ये 171 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत त्याने 56 बॉलमध्येच शतक पूर्ण केले होते.
advertisement
3/7
वैभव सूर्यवंशीच्या या शानदार खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 433 धावा ठोकल्या होत्या. विशेषे म्हणजे वैभव व्यतिरिक्त आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रानेही 69 धावांचेही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
advertisement
4/7
दरम्यान वैभवने हा रेकॉर्ड केल्याच्या काही तासातच मोडला गेला आहे. कारण मलेशियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा युवा फलंदाज समीर मिन्हासने हा विक्रम मोडला.
advertisement
5/7
पाकिस्तानच्या मिन्हासने 148 बॉलमध्ये 177 धावांची नाबाद खेळी केली होती.त्यामुळे वैभवचा 171 धावांचा रेकॉर्ड मोडला गेला. विशेष म्हणजे मिन्हासच्या या धावामुळे पाकिस्तान संघाने 3 बाद 345 धावांपर्यंत मजल मारली होती.
advertisement
6/7
वैभवने 14 वर्षांच्या वयात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध 61 चेंडू नाबाद 108 धावा करून हा विक्रम प्रस्थापित केला. 14 वर्षांच्या वयापर्यंत तीन टी20 शतके करणारा वैभव हा एकमेव खेळाडू आहे.
advertisement
7/7
तसेच 14 वर्षे आणि 32 दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम वैभवने केला आहे.या बाबतीत तो कर्णधार रियान परागपेक्षा खूप पुढे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : रेकॉर्ड करूनही वैभव सूर्यवंशीचा हार्टब्रेक,काही तासात पाकिस्तानी खेळाडूने मोडला विक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल