धक्कादायक! धावत्या बसची मागील दोन्ही चाकं निखळली, 25 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पालघर अपघाताचा तपास सुरू असून टायर निखळण्यामागील कारणांचा शोध एसटी प्रशासन घेत आहे. (राहुल पाटील, प्रतिनिधी)
advertisement
1/7

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गलथान कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरहून मनोरकडे जाणाऱ्या एसटी बसला अचानक मागील भागातील दोन्ही टायर निखळल्याने मोठी दुर्घटना घडली.
advertisement
2/7
टायर निखळल्यानंतरही बस तब्बल ३० ते ४० मीटरपर्यंत घसरत गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बसचा ताबा न सोडता ती थांबवली आणि सर्व प्रवासी थोडक्यात बचावले.
advertisement
3/7
घटनेच्या वेळी बसमध्ये किमान २० ते २५ प्रवासी होते. अचानक जोराचा आवाज झाल्यानंतर बस हलू लागली. मागून धूळ उडू लागल्याने प्रवासी घाबरले.
advertisement
4/7
काहीजणांनी बसच्या पुढे धाव घेत मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. मात्र चालकाने शांतपणे बस सुरक्षित स्थळी थांबवत मोठा अनर्थ टाळला.
advertisement
5/7
दरम्यान, या घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाचा निकृष्ट आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नियमित देखभाल नसल्याने अशा घटना वाढत असल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे.
advertisement
6/7
दुरुस्तीची कामे टाळाटाळीत आणि दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी केला. अपघाताचा तपास सुरू असून टायर निखळण्यामागील कारणांचा शोध एसटी प्रशासन घेत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ तातडीने थांबवावा, देखभाल यंत्रणा सुधारावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी केली आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
धक्कादायक! धावत्या बसची मागील दोन्ही चाकं निखळली, 25 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप