TRENDING:

Hyundai Venue घेऊन साहिल उलटा धबधबा पाहायला गेला, गवताने घात केला अन् 300 फूट दरीत कोसळला, पहिले PHOTOS

Last Updated:
साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील गुजरवाडी इथं फिरायला गेलेल्या पर्यटकांची hyundai venue टेबल लँडवरून 300 फूट दरीत कोसळली. (विशाल पाटील, प्रतिनिधी)
advertisement
1/7
Hyundai Venue मागे घेत होता अन् गवताने घात केला; 300 फूट दरीत साहिल कोसळला
सध्या पावसाळ्याचे दिवस असून पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करत आहे. अशातच साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील गुजरवाडी इथं फिरायला गेलेल्या पर्यटकांची hyundai venue टेबल लँडवरून 300 फूट दरीत कोसळली. गवतावरून चाकं घसरल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात एक तरुण जखमी झाला आहे.
advertisement
2/7
पाटण ते सडावाघापूर या रस्त्यावरील सडावाघापूर याठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक येथे जात असतात. पाटणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉईंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे. या टेबल पॉईंटच्या दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. याठिकाणी फोटोसेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात.
advertisement
3/7
बुधवार ९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव (वय २०) हा hyundai venueया SUV (एम. एच. ५०. एक्स. ५८५९) ने आपल्या मित्रांसोबत फिरायला आला होता.
advertisement
4/7
टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते. सायंकाळी ४.१५ च्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो कारसह ३०० फूट खोल दरीत कोसळला.
advertisement
5/7
यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाटण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर, राजेंद्र मोहिते, होमगार्ड आकाश चव्हाण, दीपक मिसाळ आदी टीमसोबत अपघातस्थळी दाखल झाले.
advertisement
6/7
पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरूल ता. पाटण येथील किंगमेकर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले.
advertisement
7/7
गंभीर जखमी साहिल जाधव याला उपचारकरिता सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे पाठवण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Hyundai Venue घेऊन साहिल उलटा धबधबा पाहायला गेला, गवताने घात केला अन् 300 फूट दरीत कोसळला, पहिले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल