Mahindra XUV400 सेफ्टीमध्ये ठरली 5-स्टार SUV! अडल्टसह चाइल्ड सेफ्टीतही बेस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Mahindra XUV400 Safety Rating: प्रौढांच्या सुरक्षेसाठी, या EV ला 32 पैकी 30.38 गुण मिळाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षिततेसाठी, SUV ला 49 पैकी 43 गुण दिले आहेत.
advertisement
1/7

Mahindra XUV400 Safety Rating: महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक SUV आता सुरक्षेच्या दृष्टीने 5 स्टार बनली आहे. नुकतीच, भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने क्रॅश टेस्ट केली आहे, ज्यामध्ये महिंद्र XUV400 ने सर्व 5 स्टार मिळवले आहेत.
advertisement
2/7
XUV400 ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये मुले आणि प्रौढ दोघांसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढांच्या सुरक्षेसाठी, या EV ला 32 पैकी 30.38 गुण मिळाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षिततेसाठी, SUV ला 49 पैकी 43 गुण दिले आहेत.
advertisement
3/7
या गाडीने बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 14.38 आणि साइड मूव्हेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 16 गुण मिळवले आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे.
advertisement
4/7
महिंद्रा एक्सयूव्ही 400 मध्ये 34.5 किलोव्हॅट-आर बॅटरी लावण्यात आली आहे. ही बॅटरी पॅक 159 पीएस ताकत आणि 310 एनएम पीक टार्क जनरेट करते. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी पॅक 375 किमीपर्यंत रेंज देते.
advertisement
5/7
या कारमध्ये 3.3 किलोव्हॅट आणि 7.2 किलोव्हॅट चार्जरचा ऑप्शन देण्यात आला आहे. एक्सयू्व्ही 400 ईएलविषयी बोलायचं झाल्यास. यात 39.4 किलोव्हॅट-आर लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळत आहे. जो सिंगल चार्जमध्ये 456 किमीपर्यंत रेज देतो.
advertisement
6/7
ही कार फक्त 8.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते. तर तिचा टॉप स्पीड 150 किमी/ताशी आहे. या कारला फन, फास्ट आणि फियरलेस असे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.
advertisement
7/7
भारतात, नवीन Mahindra XUV400 ची थेट स्पर्धा Tata Nexon EV शी सुरू झाली आहे, या व्यतिरिक्त, MG ZS EV आणि Hyundai Kona देखील याला टक्कर देतील. कंपनीने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाईट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू या 5 कलर्समध्ये लॉन्च केली आहे. ड्युअल टोनमध्ये सेटिन कॉपरचा ऑप्शनही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mahindra XUV400 सेफ्टीमध्ये ठरली 5-स्टार SUV! अडल्टसह चाइल्ड सेफ्टीतही बेस्ट