जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 3) आढावा बैठक झाली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भाविकांना ओंकारेश्वरच्या धर्तीवर घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करता येईल, तसेच गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहापर्यंत दर्शन मिळणार असून, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दर्शन रांगेतच बाहेर प्रसाद वाटप करता येईल, असे देवस्थानचे उपाध्यक्ष टोपरे यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे यात्रा भरते, देशभरातून लाखो भाविक येतात. गाभारा दर्शन सुरू ठेवल्यास चार ते पाच तास लागतात. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा दरवाजातून मुखदर्शनाचा निर्णय घेण्यात आला.
देवस्थान कार्यालयातील आढावा बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सरपंच प्रकाश पाटील, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष योगेश टोपरे, विश्वस्त संजय वैद्य, राजेंद्र कौशिके आदी उपस्थित होते.






