TRENDING:

हिवाळ्यात Bike वर कशाला फिरायचं? 1999 रुपये EMI वर घरी आणा Maruti ची 34 किमी मायलेज देणारी Car

Last Updated:
दिवाळीचा सण आल्यामुळे सगळ्याच वाहन उत्पादक कंपन्यांकडून कार आणि एसयूव्हीवर ऑफरचा पाऊस पाडला आहे. अशातच मारुती सुझुकीची लेजेंड कार असलेली...
advertisement
1/8
हिवाळ्यात Bike वर कशाला फिरायचं?1999 रुपये EMI वर घरी आणा Maruti ची Car
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर आता वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच दिवाळीचा सण आल्यामुळे सगळ्याच वाहन उत्पादक कंपन्यांकडून कार आणि एसयूव्हीवर ऑफरचा पाऊस पाडला आहे. अशातच मारुती सुझुकीची लेजेंड कार असलेली Alto k10 ही तुम्हाला १९९९ रुपये EMI वर घरी आणता येणार आहे. मारूतीच्या सर्वात स्वस्त अशा दोन गाड्यांवर ही ऑफर सुरू आहे. 
advertisement
2/8
जीएसटी कपातीनंतर, मारुती सुझुकीने पहिल्या आठ दिवसांत १.६५ लाख वाहनं विकली होती. त्यानंतर आता दिवाळीचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे  मारुती सुझुकीने स्वस्तात मस्त अशी ऑफर आणली आहे. alto k10 आणि  S-Presso या दोन कारवर 1999 रुपये EMI ची ऑफर आणली आहे.  ही ऑफर दिवाळीत सुरू आहे.
advertisement
3/8
EMI इतका कमी कसा? बाईकचा सुद्धा EMI हा जास्त असतो, मारुती सुझुकीने इतका कमी EMI कसा दिला असा साहजिक प्रश्न पडला असेल. पण हे सगळं फायन्सस कंपन्याचं गणित आहे. मुळात alto k10 ची किंमत एसटीडी (ओ) व्हेरिएंटची किंमत आता फक्त ३.६९ लाख रुपये आहे.
advertisement
4/8
त्यामुळे ही कार विकत घेण्यासाठी फक्त २० टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे. २० टक्के डाऊनपेमेंट म्हणजे, ७४ हजार रुपये भरावा लागतील. उरलेले २.९५ लाख रुपयांचं तुम्हाला लोन करावं लागेल. ५ ते ७ वर्षांची फेड ठेवली तर EMI हा फक्त 1999 रुपये इतका येतो.  
advertisement
5/8
मारुती सुझुकीच्या कारसाठी SBI, HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या बँका 8% ते 10% टक्क्याने कार लोन देत आहे. ही ऑफर मारुती सुझुकीच्या  अल्टो के१०, वॅगनआर आणि सेलेरियो सारख्या एंट्री-लेव्हल कारवर लागू आहे. 
advertisement
6/8
Alto k10 मध्ये आता ६ एअर बॅग्स देण्यात आली आहे. कारमध्ये आता  ६ एअरबॅग्ज (फ्रंट + साइड + कर्टन एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सामान ठेवण्यासाठी क्रॉसबार असे फिचर्स दिले आहेत.
advertisement
7/8
Alto k10 मध्ये  १.०-लिटर पेट्रोल इंजिन (६७ एचपी) आहे जे ई२० इंधन आहे. ही कार ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी पर्यायांसह येते. याशिवाय, अल्टो के१० चा फॅक्टरी-फिटेड सीएनजी प्रकार देखील पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील.
advertisement
8/8
Alto k10 च्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार कुणालाच आवरणार नाही. Alto k10 ही पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये २४.३९ किमी मायलेज देते. तर सीएनजी मॅन्युअल व्हेरियंटमध्ये तब्बल ३३.८५ किमी इतकं मायलेज देते. मारुतीची ही सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
हिवाळ्यात Bike वर कशाला फिरायचं? 1999 रुपये EMI वर घरी आणा Maruti ची 34 किमी मायलेज देणारी Car
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल