Kadaknath Eggs : कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमध्ये खरंच जास्त प्रोटीन असतं का? ही अंडी महाग का असतात?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Kadaknath eggs benefits : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक पौष्टिक आणि आरोग्यदायी आहाराकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. प्रोटीन, कमी फॅट आणि हृदयासाठी उपयुक्त घटक असलेले पदार्थ शोधण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा काळात कडकनाथ कोंबडीची अंडी ही आरोग्याच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहेत. कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांच्या फायद्यांबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
advertisement
1/9

कडकनाथ ही मध्य प्रदेशातील स्थानिक आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी कोंबडीची जात आहे. तिची अंडी आणि मांस सामान्य अंड्यांपेक्षा अधिक पौष्टिक मानले जातात. त्यामुळेच आज कडकनाथ अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून आरोग्याबाबत जागरूक लोकांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
advertisement
2/9
कडकनाथ अंड्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि आवश्यक फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये लो कोलेस्ट्रॉल, लो फॅट आणि हाय प्रोटीन असल्याने ही अंडी हृदयविकार आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जातात. तज्ज्ञांच्या मते, याच गुणधर्मांमुळे कडकनाथ अंडी आरोग्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात.
advertisement
3/9
डिजिटल डॉक्युमेंट लायब्ररी स्क्रिब्ड (Scribd.com) मधील माहितीनुसार, कडकनाथ अंडी आणि चिकनमध्ये सामान्य अंडी आणि चिकनच्या तुलनेत सुमारे 40 टक्के अधिक प्रोटीन आढळते. तसेच यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असते, ज्यामुळे हे अन्न एक प्रकारचे सुपरफूड मानले जाते.
advertisement
4/9
कडकनाथ कोंबडीत सामान्य ब्रॉयलर कोंबडीपेक्षा सुमारे 25 टक्के अधिक प्रोटीन असते. ब्रॉयलर कोंबडीत साधारणतः 18 टक्के प्रोटीन असते, तर कडकनाथमध्ये 11 प्रकारचे आवश्यक अमिनो अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे अमिनो अॅसिड्स स्नायूंची वाढ, ऊर्जानिर्मिती आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाचे असतात.
advertisement
5/9
कडकनाथमध्ये व्हिटॅमिन B6 भरपूर असल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जवळजवळ नसल्याने गंभीर हृदयविकारांशी संबंधित धोके कमी होतात. याशिवाय ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
advertisement
6/9
कडकनाथ अंड्यांचा रंग सामान्य अंड्यांपेक्षा वेगळा असतो. ही अंडी फिकट गुलाबी किंवा तपकिरी रंगाची असून पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. 100 ग्रॅम कडकनाथ अंड्यांमध्ये सुमारे 11.67 ग्रॅम प्रोटीन असते, तर सामान्य अंड्यांमध्ये साधारण 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन आढळते.
advertisement
7/9
एका कडकनाथ अंड्यात त्याच्या आकारानुसार (35 ते 60 ग्रॅम) 6 ते 15 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे प्रोटीन डेन्सिटी आणि पोषणगुणांच्या बाबतीत ही अंडी सामान्य अंड्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात, विशेषतः जिम करणारे, खेळाडू आणि प्रोटीनची गरज असणाऱ्यांसाठी.
advertisement
8/9
कॅलरीच्या बाबतीत, एका सामान्य कडकनाथ अंड्यात सुमारे 108 ते 145 कॅलरी, 1 ते 11 ग्रॅम फॅट आणि सुमारे 180 मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. मर्यादित प्रमाणात आणि संतुलित आहारात कडकनाथ अंडी समाविष्ट केल्यास आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होऊ शकते.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kadaknath Eggs : कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमध्ये खरंच जास्त प्रोटीन असतं का? ही अंडी महाग का असतात?