Virat Kohli : झिरो, झिरो अन् त्यानंतर इतिहास घडला... हे फक्त विराट कोहलीच करू शकतो!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहलीने 2025 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली. आधीच टी-20 मधून निवृत्त झाल्यामुळे विराट वनडे क्रिकेटही सोडून देणार का? अशी भीती निर्माण झाली. वनडेमध्ये लागोपाठ दोनवेळा शून्यवर आऊट झाल्यानंतर ही भीती आणखी वाढली.
advertisement
1/6

विराट कोहलीने 2025 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंड दौऱ्याआधी विराटने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे विराट 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर थेट ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टीम इंडियासाठी मैदानात उतरला.
advertisement
2/6
तब्बल 7 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी उतरलेल्या विराटची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्या दोन्ही वनडेमध्ये विराट शून्य रनवर आऊट झाला. टी-20 आणि टेस्ट मधून निवृत्त झाल्यानंतर फक्त वनडे खेळणाऱ्या विराटसाठी ही धोक्याची घंटा होती.
advertisement
3/6
लागोपाठ दोन सामन्यात शून्यवर आऊट झाल्यानंतर विराटचं करिअर आता संपलं का? विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. पण यानंतर विराटने जोरदार कमबॅक करत टीकाकारांची तोंडं बंद केली.
advertisement
4/6
ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या वनडेमध्ये विराटने नाबाद 74 रनची खेळी केली. या अर्धशतकाने विराटला पुन्हा एकदा सूर सापडला आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
5/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराटने 135, दुसऱ्या वनडेमध्ये 102 आणि तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद 65 रन केले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही विराटने पुन्हा एकदा धमाका केला आहे. 93 रनची खेळी करून विराट आऊट झाला.
advertisement
6/6
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा शून्य रनवर आऊट झाल्यानंतर विराटने पुढच्या 5 सामन्यांमध्ये दोन शतकं आणि तीन अर्धशतकांसह 469 रन केले आहेत. विराटचा हा फॉर्म 2027 वनडे वर्ल्ड कपची तयारी करणाऱ्या टीम इंडियासाठी नक्कीच दिलासादायक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : झिरो, झिरो अन् त्यानंतर इतिहास घडला... हे फक्त विराट कोहलीच करू शकतो!