वयाच्या 38व्या वर्षी विराट सुसाट, Gen Z रिटायरमेंट प्लान करतात, त्या वयात कोहलीने केले 3 वर्ल्ड रेकॉर्ड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा धमाकेदार बॅटिंग केली आहे. याचसोबत विराटच्या नावावर नवा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे.
advertisement
1/8

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार रन पूर्ण केले आहेत, याचसोबत त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. 28 हजार रन पूर्ण करण्यासाठी विराटला सगळ्यात कमी इनिंग लागल्या आहेत.
advertisement
2/8
विराटने फोर मारून विराटने हा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराटला 28 हजार रन पूर्ण करायला 25 रनची गरज होती.
advertisement
3/8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार रन करणारा विराट कोहली हा जगातला तिसरा क्रिकेटपटू बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराने हे रेकॉर्ड केलं आहे.
advertisement
4/8
विराट कोहलीने त्याच्या 624 व्या इनिंगमध्ये 28 हजार रन पूर्ण केले आहेत. सचिनला हा टप्पा गाठण्यासाठी 644 इनिंग तर कुमार संगकाराला 666 इनिंग लागल्या होत्या.
advertisement
5/8
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडूही बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 42 रन करताच विराटने संगकाराला मागे टाकलं. संगकाराच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,016 रन आहेत.
advertisement
6/8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 123 सामन्यांमध्ये 9,230 रन केल्या आहेत, याशिवाय त्याच्या नावावर 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4,188 रन आहेत.
advertisement
7/8
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी विराटच्या नावावर 556 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 623 इनिंगमध्ये 52.58 च्या सरासरीने 27,975 रन होते. यात त्याने 84 शतकं आणि 145 अर्धशतकंही ठोकली आहेत.
advertisement
8/8
विराट कोहलीने मागच्या 5 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वयाच्या 38व्या वर्षी विराट सुसाट, Gen Z रिटायरमेंट प्लान करतात, त्या वयात कोहलीने केले 3 वर्ल्ड रेकॉर्ड!