TRENDING:

Maruti चा धमाका,लाँचच्या आधीच SUV निघाली टँकसारखी दणकट, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Last Updated:
मारुती सुझुकीची ही तिसरी कार ठरली असून जी सेफ्टीमध्ये टँकसारखी निघाली आहे. भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki E Vitara ला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे
advertisement
1/8
Maruti चा धमाका,  SUV निघाली टँकसारखी दणकट, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाऊल टाकणार आहे. मारुती सुझुकी आपली पहिली वहिली ईलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून Maruti Suzuki E Vitara लाँच करणार आहे. पण, लाँच करण्याच्या आधीच Maruti Suzuki E Vitara ने सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे.
advertisement
2/8
मारुती सुझुकीची ही तिसरी कार ठरली असून जी सेफ्टीमध्ये टँकसारखी निघाली आहे. भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki E Vitara ला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे Maruti Suzuki E Vitara ही मार्केटमध्ये येण्याआधीच टाटा मोटर्स आणि महिंद्राला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.  
advertisement
3/8
भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki E Vitara ला सर्वाधिक  32 पैकी 31.49 गूण मिळाले आहे. ज्यामुळे ती सहज  5 स्टार रेटिंग एसयूव्ही असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.  Maruti Suzuki E Vitara मध्ये दोन्ही पुरुषांचे डमी ठेवले होते, त्यांच्या छाती, पाय आणि गुडघ्याला पूर्णपणे सुरक्षा मिळाली. तर  फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल टेस्टमध्ये 16 मधून 15.49 गूण मिळाले.
advertisement
4/8
तर Maruti Suzuki E Vitara ला बाजूने अर्थात कारच्या साईडने मुव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 16 गूण मिळाले. सोबतच, साइड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्येही कार पास झाली. कारच्या आत बसलेल्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. 
advertisement
5/8
तर लहान मुलांच्या सेफ्टीमध्ये Maruti Suzuki E Vitara ला सर्वाधिक  49 पैकी 43 गूण मिळाले आहे.  या टेस्टमध्ये सुद्धा Maruti Suzuki E Vitara ला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
advertisement
6/8
तसंच, डायनामिक आणि सीआरएस इंस्टॉलेशन टेस्टमध्ये 16 पैकी 16 गूण मिळाले आहेत. त्यामुळे कारमध्ये जर लहान मुलं असतील तर सेफ्टी एकदम फिट आहे. 
advertisement
7/8
Maruti Suzuki E Vitara मध्ये  इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फिचर्स दिले आहेत
advertisement
8/8
किंमत किती असेल? Maruti Suzuki E Vitara आता ३ डिसेंबरला लाँच होणार आहे. पण  या एसयूव्हीची किंमत ही १६ लाख ते २२ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. Maruti Suzuki E Vitara मार्केटमध्ये आता टाटा कर्व्ह EV, महिंद्रा BE6, MG ZS EV आणि Hyundai Creta Electric ला टक्कर देईल, 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti चा धमाका,लाँचच्या आधीच SUV निघाली टँकसारखी दणकट, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल