TRENDING:

Maruti Victorious: आता Creta विकून टाका, Maruti ने लाँच केली स्वस्त आणि टँकसारखी SUV, किंमतही कमी

Last Updated:
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या  Arena च्या छताखाली नवी कोरी Victoris SUV लाँच केली आहे.
advertisement
1/12
आता Creta विकून टाका, Maruti ने लाँच केली स्वस्त आणि टँकसारखी SUV, किंमतही कमी
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या  Arena च्या छताखाली नवी कोरी Victoris SUV लाँच केली आहे. मागील काही दिवसांपासून या Victoris SUV ची बरीच चर्चा रंगली होती अखेरीस कंपनीने या एसयूव्हीवरून पडदा बाजूला केला आहे. मारुती सुझुकीची ही पाचवी SUV आहे. या एसयूव्हीचं नाव  Maruti Victoris असं ठेवण्यात आलं आहे. या एसयूव्हीच्या किंमतीची अद्याप घोषणा केली नाही पण वेगवेगळ्या 6 ट्रीम व्हेरियंटमध्ये ही SUV उपलब्ध असणार आहे.
advertisement
2/12
मारुती सुझुकीने एका छोटेखानी कार्यक्रमात Victoris चं दमदार लाँचिंग केलं आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनीने या SUV ला BNCAP (Bharat New Car Assessment Programme) मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, असा दावा केला आहे.
advertisement
3/12
  हे रेटिंग वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी मिळाले आहे. चाचणी दरम्यान Maruti Suzuki Victoris ने वृद्ध व्यक्तीच्या सुरक्षेत 32 मधून 31.66 गूण मिळाले  आहे. तर लहान मुलांच्याा सुरक्षेसाठी  49 पैकी 43 गूण मिळाले आहे. हा स्कोअर कंपनीच्या सेफ्टी इंजिनियरिंग आणि मजबूत डिझाईनचा पुरावा आहे. 
advertisement
4/12
6 एअर बॅग आणि स्टँड फिचर्स Victoris SUV च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत जे की केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. या शिवाय  SUV मध्ये ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा असणार आहे. 
advertisement
5/12
एवढंच नाहीत  Maruti Suzuki Victoris SUV मध्ये हायटेक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे, त्यामुळे  8 अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ, आणि 60W फास्ट चार्जिंग मिळणार आहे. या शिवाय ऑटो एलेक्सा व्हाईस असिस्टेंट विद AI, सुझुकी कनेक्टचे 60+ कनेक्टेड कार फिचर्स आणि 8-स्पीकर सराउंड साऊंड सिस्टिम सारखे फिचर्सही दिले आहे. 
advertisement
6/12
कलर ऑप्शन - Victoris मध्ये 10 वेगवेगळ्या रंगाचा पर्याय दिला आहे. यामध्ये Arctic White, Splendid Silver, Eternal Blue, Sizzling Red, Magma Grey, Bluish Black आणि Mystic Green रंगाचा समावेश आहे. या शिवाय SUV मध्ये ३ ड्यूल-टोन कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिले आहे.  Victorisमध्ये एकूण 6 ट्रिम व्हेरिएंट असणार आहे. ज्यामध्ये  LXI, VXI, ZXI, ZXI(O), ZXI+, आणि ZXI+(O) चा समावेश आहे.
advertisement
7/12
इंजिन कसं असेल?   Maruti Suzuki Victoris मध्ये  वेगवेगळ्या पावरट्रेनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे.  पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे. विशेष म्हणजे, सीएनजीची टाकीही गाडीच्या अंतर्गत दिली आहे. ज्यामुळे बॅग ठेवण्यासाठी मोठी जागा मिळाली आहे. 
advertisement
8/12
ADAS लेव्हल 2 सिस्टिम - SUV मध्ये AWD सिस्टिम दिलं आहे जे खास करून 1.5L NA ऑटोमॅटिक व्हेंरिएटमध्ये मिळेल.  ट्रान्समिशनची बाजू पाहिली तर एसयूव्हीमध्ये 5-स्पीड मॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आणि e-CVT हे हायब्रिडसाठी गिअरबॉक्स दिला आहे.
advertisement
9/12
एवढंच नाहीतर  या SUV मध्ये  ADAS Level 2 टेक्नोलॉजी दिली आहे. तसंच ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेक,  क्रूज कंट्रोल. लेन कीप असिस्ट. हाय बीम असिस्ट,  रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट,  ब्लाइंड स्पॉट मॉनिटरआणि लेन चेंज अलर्ट सारखे फिचर्सही दिले आहे. 
advertisement
10/12
Maruti Victoris चं इंटिरिअर हे आधुनिक आहे. यामध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले जाणार आहे. तसंच या एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले स्पोर्ट दिलं. या शिवाय या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड  6 एअरबॅग, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टिपल ड्राइव्ह मोड दिले जाणार आहे. या शिवाय फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हिल आणि ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे. 
advertisement
11/12
किंमत किती आता Victoris मध्ये इतके सगळे फिचर्स दिले आहे, त्यामुळे किंमत किती असेल याबद्दल अंदाज वर्तवला जात आहे. कंपनीकडून अजून किंमती या गुलदस्त्यातच आहे. पण या  Victoris ची किंमत  11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या Victoris ची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.  
advertisement
12/12
Maruti Victoris ही एक मिड-साइज SUV आहे.  या कारचा मुकाबला Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या Popular SUVs शी होणार आहे. किंमतीबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. पण या SUV ची किंमत 10 लाख रुपयांपासून  सुरू होऊ शकते. ही एसयूव्ही Grand Vitara पेक्षा स्वस्त असणार आहे आणि Brezza पेक्षा जास्त फिचर्सने लेस असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti Victorious: आता Creta विकून टाका, Maruti ने लाँच केली स्वस्त आणि टँकसारखी SUV, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल