योहान इराणी यांच्या पणजोबांनी इराणहून भारतात येताना पारंपरिक पाककृती सोबत आणल्या. त्यामधीलच एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे श्रूसबेरी कुकी. योहान यांच्या मते, भारतीय पद्धतीने तयार करण्यात आलेली पहिली इंडियन श्रूसबेरी बिस्किटे याच बेकरीत तयार झाली. त्या काळात श्रूसबेरी बिस्किट, मावा केक आणि ब्रेडपासून व्यवसायाची सुरुवात झाली होती.
महाराष्ट्रातलं असं गाव जिथे फोडली जाते एकमेकांडी डोकी, रक्त निघालं तर मानता देवीचा प्रसाद! Video
advertisement
आज चौथी पिढी हा वारसा जपत आहे. गेली 112 वर्षे एकाच पारंपरिक पद्धतीने उत्पादन केले जात असल्यामुळे चवीत सातत्य टिकून आहे. सुरुवातीला पाच ते सहा रुपयांत मिळणारे बन आणि इतर पदार्थ आजही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. पूर्वी पाच आण्याला उत्पादने मिळत असत, अशी माहितीही योहान यांनी दिली.
रॉयल बेकरीमध्ये आज 30 ते 40 विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत. त्यामध्ये नट बिस्किट, चोको चिप बिस्किट, बदामी बिस्किट, इलायची बिस्किट, नानकट, क्रीम रोल, ब्राऊनी, मावा केक, ब्रेड यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. अनेक जुने ग्राहक आजही आपल्या पुढच्या पिढीसोबत येथे आवर्जून येतात. काही ग्राहक तिसऱ्या-चौथ्या पिढीपासून या बेकरीशी जोडलेले आहेत.
कॅम्प परिसरातील ही बेकरी केवळ खाद्यपदार्थ विकणारे ठिकाण नसून पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा एक जिवंत वारसा आहे. बदलत्या काळानुसार आधुनिकता स्वीकारली असली तरी मूळ चव आणि परंपरा कायम राखण्यात रॉयल बेकरी यशस्वी ठरली आहे. 112 वर्षांचा हा प्रवास म्हणजे सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाचा आहे.





