Traditional Recipes : तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी भन्नाट डिश, घरी बनवा स्पेशल खान्देशी लांडगे! पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Special khandeshi landage recipe : जुन्या असल्याने किंवा बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे बनवल्या जात नाहीत. कालांतराने आहे रेसिपी लुप्त होतात. पण काही लोक अशा रेसिपी शोधून त्या आपल्यासाठी नव्याने बनवत असतात.
मुंबई : रोज नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न आपल्या पडत असतो. पण तुम्हाला माहितीये अशा कित्येक रेसिपीज आहेत, ज्या खूप स्वादिष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र त्या जुन्या असल्याने किंवा बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे बनवल्या जात नाहीत. कालांतराने आहे रेसिपी लुप्त होतात. पण काही लोक अशा रेसिपी शोधून त्या आपल्यासाठी नव्याने बनवत असतात.
अशीच एक हरवत चाललेली रेसिपी शेअर केली गेली आहे, stylishachari या इंस्टाग्राग्राम अकाऊंटवर.. आज आम्ही तुम्हाला यांच्या रेसिपीनुसार स्पेशल खान्देशी लांडगे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
खान्देशी लांडगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- भिजवलेली चणाडाळ
- भिजवलेली मूगडाळ
- भिजवलेली तूरडाळ
- लसूण
- आलं
- हिरवी मिरची
- जिरे
- मोहरी
advertisement
- हळद
- कोथिंबीर
- बडीशेप
- लिंबाचा रस
- हिंग
- पांढरे तीळ
- कढीपत्ता
- तिखट
- मीठ
खान्देशी लांडगे बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी भिजवलेली चणाडाळ, भिजवलेली मूगडाळ, भिजवलेली तूरडाळ, लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरे घ्या.
- वरील सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांडयात घेऊन ते पाणी न घालता बारीक करा.
advertisement
- त्यानंतर हे मिश्रा एका भांड्यात काढून घ्या.
- आता यामध्ये हळद, कोथिंबीर, बडीशेप, मीठ आणि लिंबाचा रस घालून चमच्याच्या साहाय्याने एकत्र करा.
- दुसरीकडे गव्हाचे ताटात पीठ घ्या. यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, तेल आणि पाणी घालून कणिक मळून घ्या.
- आता या कणकेचा एक छोटा गोळा घेऊन तो चपातीप्रमाणे लाटून घ्या.
advertisement
- आता या लाटलेल्या चपातीवर डाळींचे बनवलेले मिश्रण घालून व्यवस्थित पसरवा.
- त्यांनतर त्याचा एक टाईट रोल करून घ्या. अशाच पद्धतीने सर्व रोल बनवून घ्या.
- हे सर्व रोल्स एका स्टीमरमध्ये ठेऊन छान वाफवून घ्या.
- त्यांनतर थंड करून प्रत्येक रोल कापू त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
- आता गॅसवर एक पॅन ठेवा. त्यामध्ये तेल टाकून गरम करा.
advertisement
- तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, बडीशेप, हिंग, पांढरे तीळ, कढीपत्ता आणि अगदी थोडीशी साखर घालून परतून घ्या.
- त्यानंतर यामध्ये हे बनवलेले रोलचे काप म्हणजेच लांडगे घाला आणि यालाही छान परतून घ्या.
- शेवटी यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.
advertisement
अशाप्रकारे तुमचे स्पेशल खान्देशी लांडगे तयार आहेत. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत याचा आनंद घेऊ शकता. हे लांडगे असेही खायला खूप छान लागतात. तिखटाचे प्रमाण कमी करून तुम्ही हे मुलांच्या डब्यातही देऊ शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Traditional Recipes : तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी भन्नाट डिश, घरी बनवा स्पेशल खान्देशी लांडगे! पाहा रेसिपी









