advertisement

Tasty Snacks Recipe : दुपारच्या नाश्त्यात काहीतरी चटपटीत पण हलकं खायचंय? 5 मिनिटांत बनवा टेस्टी पापडाचा चुरा

Last Updated:

Tasty and quick snacks : बऱ्याचदा आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची खूप होते. आज आम्ही तुम्हाला एक सोपी आणि अगदी 5 मिनिटांच्या आत बनणारी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्यही लागणार नाही.

पापडाचा चुरा बनवण्याची पद्धत..
पापडाचा चुरा बनवण्याची पद्धत..
मुंबई : दुपारचा नाश्ता बऱ्याच लोकांना हाकला फुलका हवा असतो. कारण दुपारी जेवण झालेलं असतं आणि नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ असते. बऱ्याचदा आपल्याला अशावेळी काहीतरी चटपटीत खाण्याची खूप होते. तुमच्या या पेचावर आम्ही बेस्ट उपाय घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला एक सोपी आणि अगदी 5 मिनिटांच्या आत बनणारी रेसिपी सांगत आहोत.
ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्यही लागणार नाही. ही सोपी रेसिपी swadmarathicha या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया झटपट आणि चटपटीत पापडाचा चुरा कसा बनवायचा.
पापडाचा चुरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- पापड
- कांदा
- टोमॅटो
- कोथिंबीर
- तिखट
- मीठ
पापडाचा चुरा बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी पडदा भाजून घ्या. तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते तळूनदेखील घेऊ शकता.
advertisement
- पापड भाजून घेतल्याने ते जास्त हेल्दी राहतात. तयामुळे टाळण्याऐवजी भाजा.
- त्यानंतर एका भांड्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट आणि मीठ घालून एकत्र करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये पापड हाताने कुस्करून घाला.
- पापड जास्त बारीक करू नका. हे मुरमुऱ्याच्या भेळीप्रमाणे असते.
- त्यानंतर त्यावर भरपूर कोथिंबीर घाला आणि एकत्र करा.
advertisement
advertisement
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये मोड आलेली कडधाने देखील घालू शकता. मात्र कडधान्ये घालताना ती आधी शिजवलेली असावी. त्याचप्रमाणे आता कैरीचे सिजन आहे. तेव्हा तुम्ही कैरीदेखील यामध्ये घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे चाट मसाला टाकू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पापड नेहमी शेवटी टाका. कारण ते लवकर ओले होण्याची शक्यता असते. यामुळे ते जास्तकाळ कुरकुरीत राहणार नाही.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tasty Snacks Recipe : दुपारच्या नाश्त्यात काहीतरी चटपटीत पण हलकं खायचंय? 5 मिनिटांत बनवा टेस्टी पापडाचा चुरा
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement