TRENDING:

'सेटवर माझ्यासोबत लैंगिक अत्याचार...', धुरंधर फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा; कोण होता तो तेही सांगितलं

Last Updated:
Dhurandhar Actress : धुरंधर फेम अभिनेत्रीने तिला ऑनलाईन मिळणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या धमक्या आणि प्रत्यक्ष आयुष्यात आलेल्या वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे.
advertisement
1/7
'सेटवर माझ्यासोबत लैंगिक अत्याचार...', धुरंधर फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा
धुरंधर फिल्मने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता ओटीटीवरही रिलीज झाल्यानंतरही ही फिल्म तितकीच पाहिली जाते आहे. पण याच फिल्ममधील अभिनेत्रीने तिला सेटवर आलेल्या भयानक अनुभवाबाबत सांगितलं आहे.
advertisement
2/7
अलीकडेच झालेल्या मोजो स्टोरी समीटमध्ये बोलताना अभिनेत्री ऑनलाइन लैंगिक शोषण, लैंगिक हिंसाचाराच्या धमक्या आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न असे क्लेशकारक अनुभव सांगितले. तिने केवळ तिला मिळणाऱ्या दररोजच्या लैंगिक धमक्याच उघड केल्या नाहीत तर एकदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न कसा झाला हे देखील सांगितले.
advertisement
3/7
अभिनेत्री म्हणाली तिला इन्स्टाग्रामवर जवळजवळ दररोज तिच्या शरीराबद्दल अश्लील कमेंट्स मिळतात. ती म्हणाली, "मी साधा टॉप घालते आणि स्कर्ट देखील घालते तेव्हा लोकांना त्रास होतो. पोस्ट करण्यापूर्वी मला काय घालायचे याचा विचार करावा लागतो. काहीतरी घालण्यापूर्वी किंवा पोस्ट करण्यापूर्वी कोणी मला काय म्हणाले, याचा मी विचार केला तर ते मानसिकदृष्ट्या खूप दुःखद आहे"
advertisement
4/7
तिला ऑनलाइन लैंगिक अत्याचाराच्या धमक्या मिळतात का असं विचारले असता, तिचं उत्तर धक्कादायक होते. ती म्हणाली, "हो दररोज. मी माझा फोन उघडू शकते आणि आत्ताच तुम्हाला दाखवू शकते.कमेंटमध्ये लोक लिहितात की जर त्यांच्याकडे पॉवर अशेल तर ते तिच्यासोबत काहीही करतील, ज्यामुळे ती घाबरते कारण हे खरे लोक आहेत जे आपल्या आजूबाजूला राहतात"
advertisement
5/7
यावेळी तिने तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षण देखील शेअर केला. ती म्हणाली, "माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, पण कधीकधी जखम ताजी होते. मी एका फिल्मचं शूटिंग करत होते. माझे वडीलही तिथंच होते. मी इन्स्टाग्राम उघडलं आणि पाहिलं की एक व्यक्ती मला बऱ्याच काळापासून व्हॉइस नोट्स पाठवत होता. अधिक चौकशी केल्यानंतर तो माणूस सेटवरचा स्पॉटबॉय असल्याचं समजलं"
advertisement
6/7
अभिनेत्रीने ताबडतोब तिच्या वडिलांना सांगितलं आणि प्रोडक्शन टीमकडे तक्रार केली. त्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याचं ती म्हणाली.  पण तिला अशीच घटना पुन्हा घडण्याची भीती वाटते, विशेषतः जेव्हा ती सेटवर असते किंवा प्रवास करत असते.
advertisement
7/7
ही अभिनेत्री आहे आयेशा खान. बिग बॉस 17 फेम आणि धुरंधर स्टार आयशाने सार्वजनिक जीवनात महिलांना येणाऱ्या आव्हानांबद्दल उघडपणे सांगितलं आहे. ती सतत ट्रोल होत असतेय धुरंधर फिल्ममधील शरारत गाणं मासिक पाळी असताना शूट केल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला, असं ती म्हणाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सेटवर माझ्यासोबत लैंगिक अत्याचार...', धुरंधर फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा; कोण होता तो तेही सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल