TRENDING:

Astrology: भारी जमणाऱ्या राशींच्या जोड्या; नवरा-बायको या राशींचे असतील तर सहजीवनात आनंद अपार

Last Updated:
Perfect Zodiac Match: लग्न आणि नात्यांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत असतो, आम्ही दोघं खरंच एकमेकांसाठी बनलो आहोत का? म्हणूनच आपल्याकडे वर्षानुवर्षे राशी गुण पाहण्याला महत्त्व दिलं जातं. काही राशींमध्ये नातं असं काही जुळतं की काळानुसार ते कमी होण्याऐवजी अजूनच घट्ट होत जातं. या जोड्यांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्यात मैत्री, समज आणि ओढ यांचा एक वेगळाच तागा असतो. ज्योतिष मानतं की यामागे फक्त वागणं नाही, तर ग्रहांची मैत्री पण कारणीभूत असते.
advertisement
1/9
भारी जमणाऱ्या राशींच्या जोड्या; नवरा-बायको या राशींचे असतील तर सहजीवनात आनंद
सगळ्या 12 राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही राशींमध्ये खटके उडतात, तर काही एकमेकांना मस्त सांभाळून घेतात. जेव्हा दोन राशींचे मालक ग्रह एकमेकांचे मित्र असतात, तेव्हा त्या दोन माणसांमध्ये आपोआपच ओढ आणि एकमेकांबद्दल आदर राहतो. अशा नात्यात वेळ जाईल तशी समज वाढत जाते आणि अंतर कमी होत जातं.
advertisement
2/9
मिथुन आणि तूळ: या दोन्ही राशींच्या लोकांना बोलायला आणि आपल्या भावना मांडायला खूप आवडतं. दोघंही एकमेकांशी मनमोकळं बोलतात आणि एकमेकांचं ऐकूनही घेतात. हा संवादच त्यांच्या नात्याची ताकद असते. हे कपल पती-पत्नीपेक्षा एकमेकांचे जास्त चांगले मित्र असतात.
advertisement
3/9
सिंह आणि तूळ: सिंह राशीचा आत्मविश्वास आणि तूळ राशीचा शांत, समतोल स्वभाव एकमेकांना मस्त साथ देतात. या जोडीचा रुबाब समाजात वेगळाच दिसतो आणि ते एकमेकांचा मान नेहमी जपतात.
advertisement
4/9
मेष आणि कुंभ: स्वातंत्र्याचा आदर करणारे मानले जातात. मेष आणि कुंभ या दोन्ही राशींचे विचार एकदम मोकळे असतात. त्यांना आयुष्यात नवीन काहीतरी करायला आवडतं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते एकमेकांच्या खाजगी आयुष्यात लुडबूड करत नाहीत आणि एकमेकांना स्पेस देतात.
advertisement
5/9
वृषभ आणि वृश्चिक: या दोन्ही राशी नात्याकडे खूप गांभीर्याने बघतात. त्यांच्यासाठी विश्वास हा सर्वात मोठा असतो. एकदा का एकमेकांवर विश्वास बसला की त्यांचं भावनिक नातं खूप खोलवर असतं. त्यामुळे त्यांचं लग्न खूप टिकतं.
advertisement
6/9
वृषभ आणि कन्या: वृषभ आणि कन्या राशीचे लोक खूप प्रॅक्टिकल असतात. त्यांच्यासाठी घर, कुटुंब आणि सुरक्षित भविष्य हे सगळ्यात आधी असतं. ते दोघं मिळून आयुष्याचं नियोजन खूप छान करतात. त्यांच्या नात्यात स्थिरता असते.
advertisement
7/9
सिंह आणि धनु: सिंह आणि धनु या दोन्ही राशी एकदम पॉझिटिव्ह असतात. धनु राशीचा उत्साह बघून सिंह राशीला प्रेरणा मिळते, तर सिंहाचा कॉन्फिडन्स धनुला आवडतो. ही जोडी आयुष्यातल्या संकटांना एकत्र हसत हसत तोंड देते.
advertisement
8/9
कन्या आणि मकर: कन्या आणि मकर राशीचे लोक थोडे गंभीर आणि ध्येयवादी असतात. त्यांच्या नात्यात खोटा दिखावा नसतो. दोघं मिळून आयुष्यात काय मिळवायचंय हे ठरवतात आणि एकमेकांच्या मदतीने ते पूर्ण करतात.
advertisement
9/9
मिथुन आणि कुंभ: या जोडीचा पाया बुद्धिमत्ता असतो. दोघांनाही नवीन गोष्टी शिकायला आणि फिरायला खूप आवडतं. यांची सुरुवात मैत्रीतून होते आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर मोठ्या प्रेमात होतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भारी जमणाऱ्या राशींच्या जोड्या; नवरा-बायको या राशींचे असतील तर सहजीवनात आनंद अपार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल