TRENDING:

ग्रहण संपलं तरी संकट टळलं नाही! आज चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा सोसावे लागतील हाल

Last Updated:
काल 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण पार पडले. 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष काळ झाला असला, तरी ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहणाचे 'वेध' आणि त्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहतो.
advertisement
1/7
ग्रहण संपलं तरी संकट टळलं नाही! आज चुकूनही करू नका 'ही' काम
काल 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण पार पडले. 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष काळ झाला असला, तरी ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहणाचे 'वेध' आणि त्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहतो. विशेषतः सिंह राशीत लागलेल्या या ग्रहणामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निवळण्यासाठी काही काळ जावा लागतो. अशा स्थितीत, ग्रहण संपले म्हणून गाफील राहू नका. जर तुम्ही पुढील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/7
अशुद्ध अवस्थेत देवघराला स्पर्श: ग्रहण संपल्यानंतर अनेकजण घाईघाईने दिवा लावण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी देवघराकडे जातात. मात्र, जोपर्यंत तुम्ही 'मोक्ष स्नान' म्हणजेच शुद्धीकरण स्नान करत नाही आणि संपूर्ण देवघर गंगाजलाने स्वच्छ करत नाही, तोपर्यंत मूर्तींना स्पर्श करू नका. अशुद्ध अवस्थेत केलेली पूजा शुभ फळ देण्याऐवजी दोष निर्माण करू शकते.
advertisement
3/7
शिळ्या अन्नाचे सेवन: ग्रहणापूर्वी शिजवलेले अन्न, ज्यामध्ये तुम्ही तुळशीची पाने टाकली नव्हती, असे अन्न आज खाणे टाळा. ग्रहणाच्या काळात सूक्ष्म जंतू आणि हानिकारक लहरींचा प्रभाव अन्नावर होतो. असे 'अशुद्ध' अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार किंवा दीर्घकाळ आजारपण मागे लागू शकते.
advertisement
4/7
नकारात्मक बोलणे आणि वादविवाद: ग्रहणाचा प्रभाव मनावर आणि मेंदूवर 3 ते 4 दिवस राहतो. या काळात रागावर नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्यांशी किंवा जोडीदाराशी केलेले वादविवाद कायमस्वरूपी दुरावा निर्माण करू शकतात. घरामध्ये क्लेश झाल्यास लक्ष्मी प्रसन्न होत नाही, हे लक्षात ठेवा.
advertisement
5/7
तात्काळ मोठी गुंतवणूक: बुध आणि गुरु वक्री असल्याने आणि ग्रहणाचे सावट असल्याने, ग्रहण संपल्या संपल्या लगेच मोठे आर्थिक व्यवहार किंवा नवीन व्यवसाय सुरू करू नका. किमान 2-3 दिवस थांबून ग्रहांची स्थिती स्थिर झाल्यावरच निर्णय घ्या, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.
advertisement
6/7
घराची स्वच्छता न करणे: ग्रहण संपल्यावर केवळ स्वतः आंघोळ करून चालत नाही. जर तुम्ही घराची स्वच्छता केली नाही, तर ग्रहणाने सोडलेली नकारात्मक ऊर्जा घरातच राहते. पाण्यात थोडे मीठ टाकून घर पुसून घेतल्याने नकारात्मकता दूर होते.
advertisement
7/7
गर्भवती महिलांनी गाफील राहू नये: जरी ग्रहण संपले असले तरी, गर्भवती महिलांनी पुढील 24 तास जड कामे करणे किंवा जास्त प्रवास करणे टाळावे. ग्रहणाचा प्रभाव हळूहळू ओसरतो, त्यामुळे विश्रांती घेणे आणि नामस्मरण सुरू ठेवणे बाळाच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ग्रहण संपलं तरी संकट टळलं नाही! आज चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा सोसावे लागतील हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल