6,000रुपयांहून कमीमध्ये 6,000mAh बॅटरीचा नवा स्मार्टफोन! Ai+ Pulse 2 बेस्ट बजेट ऑप्शन?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Ai+ Pulse 2 भारतात लॉन्च झाला आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी, 120Hz HD+ डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि अँड्रॉइड 16 बेस्ड NxtQuantum OS मिळते. लॉन्च ऑफरमध्ये किंमत 5,999 रुपयांपासून सुरु. जाणून घेऊया फीचर्स आणि उपलब्धता.
advertisement
1/7

Ai+ पल्स 2 ला कंपनीने आपल्या मागच्या मॉडल पल्स 1 च्या अपग्रेडच्या रुपात सादर केला आहे. ही एंट्री-लेव्हल स्मार्टफोन अशा यूझर्सला लक्षात ठेवून लॉन्च केला आहे. ज्यांना कमी किंमती मोठी बॅटरी, स्मूथ डिस्प्ले आणि लेटेस्ट सॉफ्टवेयर हवे आहे.लॉन्च ऑफर आणि बेस्ट स्पेसिफिकेशनसह हे डिव्हाइस बजेट मार्केटमध्ये मजबूत दावेदार बनू शकते.
advertisement
2/7
किंमत आणि लॉन्च ऑफर Ai+ पल्स 2 दोन व्हेरिएंटमध्ये येतात. 4GB + 64GB आणि 6GB + 128GB. लॉन्च ऑफर अंतर्गत 4GB मॉडल पहिले 24 तासांसाठी 5,999 रुपयांत उपलब्ध होईल. तर 6GB व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकेल. यानंतर किंमती सामान्य होईल. या प्राइज रेंजमध्ये 120Hz डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी याला खास बनवते.
advertisement
3/7
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस : फोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ V-नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हे मागच्या मॉडलच्या 90Hz पॅनलपेक्षा अपग्रेड आहे. ज्याने स्क्रॉलिंग आणि गेमिंगचा अनुभव जास्त स्मूथ होईल. डिस्प्ले 450 निट्स ब्राइटनेस आणि 10-पॉइंट मल्टी-टच सपोर्टसह येतो.
advertisement
4/7
हे डिव्हाइस 12nm प्रोसेस टेक्नॉलॉजीवर आधारित Unisoc T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालते. यात LPDDR4x रॅम आणि eMMC स्टोरेज आहे. हा फोन अँड्रॉइड 16-आधारित NxtQuantum OS वर चालतो, जो यूझर्सना लेटेस्ट फीचर्स आणि सुधारित सॉफ्टवेअर सपोर्ट प्रदान करतो.
advertisement
5/7
कॅमेरा आणि बॅटरी : फोटोग्राफीसाठी 50MP ड्यूल AI रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा मिळतो. जो व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियासाठी उपयुक्त आहे.
advertisement
6/7
फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच IP64 रेटिंग याला डस्ट आणि थोड्या पाण्यापासून सुरक्षित ठेवते.
advertisement
7/7
Ai+ Pulse 2 हा स्मार्टफोन 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तो हिरवा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल. मोठी बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट आणि नवीनतम Android 16 सह, Pulse 2 हा बजेट यूझर्ससाठी एक किफायतशीर पर्याय बनण्यास सज्ज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
6,000रुपयांहून कमीमध्ये 6,000mAh बॅटरीचा नवा स्मार्टफोन! Ai+ Pulse 2 बेस्ट बजेट ऑप्शन?