Car Tips:...म्हणून उन्हाळ्यात कार होते आगीचा गोळा, 99 टक्के लोक करतात एकच चूक!
- Published by:Sachin S
Last Updated:
उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला असतो. अशा वेळी वाहनांवर याचा जास्त परिणाम होतो. कारमधील बॅटरी, टायर आणि रंगावर फरक जाणवत असतो.
advertisement
1/10

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाला असून अंगााची लाहीलाही करण्याचा हा महिना आहे. उन्हाळ्यात जसं शरिराची काळजी घ्यावी लागते, तसंच वाहनाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण, या हंगामामध्ये वाहनांची खास देखभाल करणे गरजेचं आहे. कारण, उन्हाळ्यामध्ये कारच्या इंजिन, बॅटरी आणि टायरावर जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात बॅटरी, टायरकडे लक्ष दिलं नाही तर ओव्हर हिटिंगमुळे आग लागण्याची शक्यता असते.
advertisement
2/10
उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला असतो. अशा वेळी वाहनांवर याचा जास्त परिणाम होतो. कारमधील बॅटरी, टायर आणि रंगावर फरक जाणवत असतो. उष्णतेमुळे कारमधील बॅटरी ओव्हरहिट होते आणि बंद पडते. बॅटरीमध्ये रासायनिक पाणी असतं.
advertisement
3/10
त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं. त्यामुळे बॅटरीमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं तर बॅटरी कोडरी पडू लागते. उष्णतेमुळे बॅटरीतील आतील भाग गजण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅटरीची लाईफ कमी होते. त्यामुळे गाडी सुरू करताना बॅटरी अचानक डाऊन होऊ शकते. अनेकदा उष्णतेमुळे बॅटरीची प्लेट्स खराब होऊ शकतात आणि बॅटरी फुगण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात बॅटरीचं टर्मिनल स्वच्छ ठेवा, बॅटरीतील पाण्याची लेव्हल नेहमी तपासात राहा.
advertisement
4/10
कुलेंटची तपासणी करा - उन्हाळ्यामध्ये कारमध्ये ओव्हरहिटिंगची समस्या जास्त असते. अशा वेळी कारमधील कुलेंट, रेडिएटर आणि वॉटर पंप नेहमी तपासात राहा. जर लांबपल्ल्याचा प्रवास असेल तेव्हा या गोष्टी आधी तपासून पाहाव्यात. जर कुलेंट कमी असेल तर टॉप अप करा आणि कुलेंट जास्त जुनं असेल तर बदलून घ्या, कुलेंटला प्रत्येक २० हजार किमी वाहन चालवल्यानंतर बदलून घेणे गरजेचं आहे. कुलेंट नसेल तर कार ओव्हरहीट होईल आणि बंद पडू शकते.
advertisement
5/10
टायरांची काळजी घ्या- उन्हााळ्याच्या काळात टायराकडे लक्ष राहु द्या. टायरमध्ये किती हवा भरली आणि किती प्रेशर आहे, याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळा नियमित तपासणी करून सुद्धा टायर फुटण्याच्या घटना घडतात.
advertisement
6/10
उन्हाळ्यात रस्ता आणि टायराचं घर्षण झाल्यामुळे तापमान जास्त होतं, त्यामुळे टायर फुटण्याची शक्यता निर्माण होते. उन्हाळ्यात गाडीच्या टायरांमध्ये नायट्रोजन एअर भरावी, त्यामुळे उष्णतेचं प्रमाण कमी होतं आणि टायराचं आयुष्य वाढतं. नायट्रोजन एअरमुळे टायर फुटण्याचा धोका हा कमी असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात टायर जास्त जुनं झालं असेल तर बदलून घेतलं पाहिजे.
advertisement
7/10
शॉर्ट सर्किट - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कारमध्ये शॉर्ट सर्किटचे प्रमाण जास्त असतं, त्याचं कारण म्हणजे, कारमध्ये आपण मार्केटमधून काही साहित्य खरेदी करतो, जसे म्युझिक सिस्टम लावतो, चांगले स्पिकर लावतो.
advertisement
8/10
पण, जर हे काम करत असता चांगल्या प्रतीचे वायर पाहिजे. बऱ्यााच वेळाा कमी दर्जेचे किंवा वायरची गुणवत्ता खराब असेल, तर उष्णतेमुळे वायरचे कोटिंग वितळते. यामुळे शॉर्ट सर्किट होऊन इंजिनमध्ये किंवा डॅशबोर्डच्या मागे आग लागण्याची शक्यता असते.
advertisement
9/10
इंधन गळती - उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढली की इंजिनमध्ये प्रमाण हे त्याचं जास्त असतं. अशा वेळी रबरचे पाईप हे कडक होतात आणि तडे जातात, बऱ्याच वेळा फ्युल लाईनमध्ये पेट्रोल आणि डिझेलची गळती होते, त्यामुळे इंजिनच्या संपर्कात आले तर आग लागू शकते.
advertisement
10/10
उन्हाळ्यामध्ये कारमध्ये छान असा वास राहण्यासाठी सॅनिटायझर, परफ्युमच्या बाटल्या वापरू नये. तसंच, जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर गॅस लायटर अजिबात गाडीत ठेवू नये, तसंच मोबाईल फोन चार्ज करणारी पॉवर बँक ठेवू नका. उन्हात उभ्या असलेल्या गाडीचे तापमान आतल्या आत ६०-७० अंशांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे अशे ज्वलनशील पदार्थ गाडीमध्ये ठेवू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car Tips:...म्हणून उन्हाळ्यात कार होते आगीचा गोळा, 99 टक्के लोक करतात एकच चूक!