पुण्यामध्ये होळीच्या इव्हेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या इव्हेंटमध्ये स्टेज कोसळला आहे. स्टेजचा काही भाग कोसळून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.