27 किमी मायलेज, 7 जण आरामात बसतील, फॅमिलीसाठी बेस्ट MPV; किंमतही 5.25 लाखांपासून
- Published by:Sachin S
Last Updated:
एक अशी ७ सीटर कार आहे जी फॅमिलीसाठी बेस्ट आहे आणि बजेटसाठीही एकदम योग्य आहे. विशेष म्हणजे, या गाडीचं मायलेज सुद्धा 27 किमी इतकं आहे. त्यामुळे ही आतापर्यंत फॅमिलीसाठी एकदम बेस्ट अशी एमपीव्ही ठरली आहे.
advertisement
1/8

आपल्या दारात कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, पहिली कार एकट्यासाठी घ्यायची की फॅमिलीसाठी घ्यायची हा मोठी प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकतो. त्यामुळे एक अशी ७ सीटर कार आहे जी फॅमिलीसाठी बेस्ट आहे आणि बजेटसाठीही एकदम योग्य आहे. विशेष म्हणजे, या गाडीचं मायलेज सुद्धा 27 किमी इतकं आहे. त्यामुळे ही आतापर्यंत फॅमिलीसाठी एकदम बेस्ट अशी एमपीव्ही ठरली आहे. या गाडीचं नाव आहे Maruti Suzuki Eeco.
advertisement
2/8
Maruti Suzuki Eeco ही ग्रामीण आणि शहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली आहे. ही गाडी व्यवसायासाठी हे बेस्ट पर्याय आहे. कारण , या Maruti Suzuki Eeco चा मल्टिपल वापरासाठी बेस्ट पर्याय आहे.
advertisement
3/8
Maruti Suzuki Eeco मध्ये ७ जण कसे बसतील अशी मांडणी केली आहे. दोन्ही बाजूने स्लायडिंग डोअर्स दिले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने चढणे आणि उतरणे सोपे आहे. गाडीची उंची ही जास्त आहे.
advertisement
4/8
त्यामुळे Maruti Suzuki Eeco मधे भरपूर जागा आहे. मध्ये २ आणि पाठीमागे ३ अशी मांडणी केली आहे. त्यामुळे ५ जणांना आरामात बसता येतं. तर समोर ड्रायव्हर मिळून २ जणांना बसता येतं.
advertisement
5/8
Maruti Suzuki Eeco मध्ये एअरबॅग्स, ABS सह EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि इंजिन इमोबिलायझर साारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
6/8
Maruti Suzuki Eeco मध्ये १.२-लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे, यामध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही गाडी १९-२० किमी मायलेज देते. CNG व्हेरियंटमध्ये २६-२७ किमी इतकं मायलेज देते.
advertisement
7/8
Maruti Suzuki Eeco जर तुम्ही विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर EMI चा पर्यायही सुद्धा आहे. Maruti Suzuki Eeco ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.२५ लाखांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरियंटची किंमत ७.३५ लाख रुपयांपर्यंत आहे.
advertisement
8/8
ही Maruti Suzuki Eeco ५-सीटर आणि ७-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही १ लाख रुपये डाऊन पेमेंट करून Maruti Suzuki Eeco ही फॅमिलीसाठी कार दारात आणू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
27 किमी मायलेज, 7 जण आरामात बसतील, फॅमिलीसाठी बेस्ट MPV; किंमतही 5.25 लाखांपासून