TRENDING:

फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' 5 शानदार SUV! किंमत फक्त 7.51 लाखांपासून सुरू

Last Updated:
फॅमिलीसाठी कार खरेदी करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्या लोकांना एसयूव्ही खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही 5 भारी ऑप्शन घेऊन आलो आहोत. चला पाहूया लिस्ट...
advertisement
1/10
फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' 5 शानदार SUV! किंमत फक्त 7.51 लाखांपासून सुरू
Tata Nexon भारतातील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे. तुमची प्रायोरिटी 5-स्टार सेफ्टी रेटिंगआणि मजबूत बिल्ड क्वालिटी असेल तर ही बेस्ट चॉइस आहे. याची सुरुवातीची किंमत 8.00 लाख रुपयांपासून सुरू होते. सिटी ड्रायव्हिंग असो किंवा हायबे, नेक्सॉनचा मस्कुलर लूक तुम्हाला नेहमी रोडवर एक वेगळाच कॉन्फिडेन्स देतो.
advertisement
2/10
या कारच्या इंडीरियरमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. मायलेजविषयी बोलायचं झाल्या, पेट्रोलमध्ये ते 17.4kmpl आणि डिझेलमध्ये 23.2 kmpl पर्यंत शानदार अॅव्हरेज देते. 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये याचे स्मार्ट आणि प्योर व्हेरिएंट्स सुरक्षित आणि नो कंप्रोमाज फॅमिली एसयूव्हीची जाणीव करुन देतात.
advertisement
3/10
Mahindra XUV 3XOतिच्या शक्तिशाली टर्बोचार्ज्ड इंजिनसाठी ओळखली जाते, जे तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक टॉर्क देते, ज्यामुळे ती चालवताना खूप आनंद मिळतो. तिची सुरुवातीची किंमत फक्त 7.49 लाख रुपये आहे. तिची रुंदी तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे, ज्यामुळे मागच्या सीटवर तीन लोक आरामात बसू शकतात.
advertisement
4/10
यामध्ये तुम्हाला ड्यूअल पॅन पॅनोरमिक सुनरूफ मिळतो. जो या बजेटमध्ये पहिल्यांदा आहे. ही पेट्रोलवर 18.8 kmpl आणि डिझेलवर 21.2 kmpl मायलेज देते. 10 लाख रुपयांच्या आत याचे MX2 आणि MX3 व्हेरिएंट्स चांगली व्हॅल्यू फॉर मनी आहे. ज्या लोकांना पॉवर आणि स्टाइल हवी आहे, त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे.
advertisement
5/10
Skoda Kylaqने बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे. तिचे सर्वात मोठे फीचर म्हणजे तिचे 1.0L TSI टर्बो पेट्रोल इंजिन. तिच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्समुळे तुम्हाला एखाद्या महागड्या लक्झरी कारमध्ये बसल्याचा अनुभव येतो. 7.89 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीसह, स्कोडाची सिग्नेचर ग्रिल आणि सॉलिड बिल्ड तिला एक अतिशय क्लासी लूक देते.
advertisement
6/10
कायलाकची बिल्ड क्वालिटी खुप प्रीमियम आहे आणि यामध्ये 6 एयरबॅग्स स्टँडर्ड मिळतात. यात 19.7 kmpl पर्यंतचं एव्हरेज मायलेज मिळतं. तुम्हाला गर्दीत उठून दिसायचं असेल आणि तुम्हाला जर्मन इंजीनियरिंगचा शौक असेल तर 10 लाख रुपयांच्या आत स्कोडा कायलाक एक सॉलिड ऑप्शन आहे.
advertisement
7/10
Hyundai Venue ची सर्वात मोठी यूएसपी याची स्मूथनेस आहे आणि रिलायबल सर्व्हिस आहे. सिटीमध्ये चालण्यासाठी हू खूप कंफर्टेबल आहे. याची एक्स शोरूम किंमत 7.94 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारची डिझाइन खुप मॉडर्न आहे आणि दिसायला ती 'बेबी क्रेटा' वाटते. लहान फॅमिलीसाठी हा खुप विश्वासार्ह ऑप्शन आहे.
advertisement
8/10
व्हेन्यूमध्ये ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक आणि सनरूफ यांसारखी अनेक फीचर्स आहेत. मायलेजच्या बाबतीत, त्याचे पेट्रोल इंजिन 17.5 kmpl लिटरची चांगली सरासरी देते आणि त्याचे डिझेल इंजिन 24.2 kmpl मायलेज देते. त्याचे एस आणि एस(ओ) व्हेरिएंट्स 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खूप लोकप्रिय आहेत, जे लक्झरी आणि इकॉनॉमी दोन्ही देतात.
advertisement
9/10
Maruti Fronx ही ज्या लोकांना चांगलं मायलेज हवंय त्यांच्यासाठी आहे. याचे कूपेसारखी डिझाइन या कारला आपल्या कॅटेगिरीमध्ये सर्वात सुंदर गाडी बनवते. याची सुरुवातीची किंमत फक्त 7.51 लाख रुपये आहे. ही गाडी चालवण्यातही खुप स्मूथ आहे. फ्रोंक्समध्ये तुम्हाला चांगली फ्यूल एफिशिएन्सीही मिळते.
advertisement
10/10
या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 21.7 kmpl आणि सीएनजी व्हेरिएंट 28.5 km/kg पर्यंत मायलेज देते. 10 लाखांच्या आत याचे सिग्मा आणि डेल्टा व्हेरिएंट्स सहज उपलब्ध होतात. चुमची प्रोयोरिटी मायलेज आणि रीसेल व्हॅल्यू असेल तर मार्केटमध्ये फ्रोंक्सपेक्षा भारी काहीच नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' 5 शानदार SUV! किंमत फक्त 7.51 लाखांपासून सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल