TRENDING:

Bike Engine Oil : बाईकचं इंजिन 'जाम' होण्यापूर्वी देते 'हे' 5 संकेत; ऑइल बदलण्याची योग्य वेळ कशी ओळखाल?

Last Updated:
अनेकांना वाटतं की अरे हे बदलायचं कधी असतं हे आधीच कळालं तर किती बरं होईल... खरंतर तुमची बाईक ऑइल बदलण्यासाठी ओरडून सांगत असते, फक्त तुम्हाला तिचे 'हे' संकेत ओळखता आले पाहिजेत. ते कसं ओळखायचं? चला जाणून घेऊ ते 5 संकेत.
advertisement
1/9
बाईकचं इंजिन जाम होण्यापूर्वी देते हे 5संकेत; ऑइल बदलण्याची योग्य वेळ कशी ओळखाल?
आपल्यापैकी अनेकांसाठी आपली बाईक किंवा स्कूटर केवळ एक वाहन नसते, तर ती रोजच्या धावपळीतली एक विश्वासू सोबती असते. ऑफिसला वेळेवर पोहोचवणं असो वा पावसाळ्यातली एखादी लॉंग राईड, आपली दुचाकी आपल्याला कधीच निराश करत नाही. पण, आपण तिच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतो का?
advertisement
2/9
जसं आपल्या शरीराला रक्ताची गरज असते, तसंच बाईकच्या इंजिनला 'इंजिन ऑइल' ची गरज असते. अनेकदा आपण फक्त पेट्रोल भरतो आणि गाडी पळवतो, पण इंजिन ऑइल बदलायला विसरतो. यामुळे इंजिनमध्ये घर्षण वाढून ते कायमचं खराब होऊ शकतं आणि मग खिशाला मोठा फटका बसतो. अशावेळी अनेकांना वाटतं की अरे हे बदलायचं कधी असतं हे आधीच कळालं तर किती बरं होईल... खरंतर तुमची बाईक ऑइल बदलण्यासाठी ओरडून सांगत असते, फक्त तुम्हाला तिचे 'हे' संकेत ओळखता आले पाहिजेत. ते कसं ओळखायचं? चला जाणून घेऊ ते 5 संकेत.
advertisement
3/9
1. डॅशबोर्डवरील 'तो' छोटा दिवा (Indicator Light)आजकालच्या बहुतांश स्मार्ट बाईक्समध्ये डॅशबोर्डवर ऑइल इंडिकेटर दिलेला असतो. जर गाडी चालवताना हा दिवा लुकलुकू लागला किंवा लाल झाला, तर याचा अर्थ इंजिनमध्ये ऑइलची पातळी कमी झाली आहे किंवा ऑइल खराब झालं आहे. हा इशारा मिळताच ताबडतोब जवळच्या गॅरेजमध्ये जाणं हिताचं असतं.
advertisement
4/9
2. इंजिनचा 'खसाखसा' आवाज येणेतुमच्या बाईकचा आवाज अचानक बदलला आहे का? जर इंजिनमधून धातू एकमेकांवर घासल्यासारखा किंवा पूर्वीपेक्षा जास्त मोठा आवाज येत असेल, तर समजून जा की ऑइल आता पाण्यासारखं पातळ झालं आहे. चांगल्या ऑइलमुळे इंजिनचे भाग स्मूथ चालतात, पण ते खराब झालं की इंजिनमध्ये 'खसाखसा' आवाज येऊ लागतो.
advertisement
5/9
3. सायलेंसरमधून निघणारा काळा धूरजर तुमच्या गाडीच्या सायलेंसरमधून काळा किंवा गडद धूर येत असेल, तर हे इंजिन ऑइल जुनं झाल्याचं किंवा जळत असल्याचं लक्षण आहे. यामुळे केवळ इंजिनच नाही, तर पर्यावरणाचंही नुकसान होतं. अशा परिस्थितीत ऑइल बदलणं अत्यंत गरजेचं असतं.
advertisement
6/9
4. रंगावरून ओळखा ऑइलची 'क्वालिटी'ताजं किंवा नवीन इंजिन ऑइल हे मध किंवा हलक्या तपकिरी रंगाचं असतं. जशी बाईक चालते, तसा या ऑइलमध्ये कार्बन जमा होतो.कसं तपासावे?इंजिनची ऑइल डिपस्टिक बाहेर काढा आणि थोडं ऑइल बोटावर घेऊन पहा. जर ते पूर्णपणे काळं पडलं असेल आणि त्यात चिकटपणा कमी झाला असेल, तर नवीन ऑइल टाकण्याची वेळ आली आहे.
advertisement
7/9
5. ऑइलची पातळी कमी होणे (Oil Level Check)इंजिनच्या बाजूला असलेल्या छोट्या काचेच्या खिडकीतून (Inspection Window) तुम्ही ऑइलची पातळी सहज पाहू शकता. जर ऑइल 'Low' मार्कच्या खाली गेलं असेल, तर इंजिन गरम होण्याची (Overheating) भीती असते. उन्हाळ्यात ऑइल लवकर कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे महिन्यातून एकदा ही पातळी स्वतः तपासायला हवी.
advertisement
8/9
साधारणपणे दर 2,500 ते 3,00 किलोमीटर नंतर इंजिन ऑइल बदलण्याचा सल्ला दिला जातो. पण तुमची गाडी धूळ किंवा जास्त गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये चालत असेल, तर त्याआधीही ऑइल बदलणं चांगलं असतं. थोडासा खर्च टाळण्यासाठी ऑइल बदलण्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा इंजिन निकामी होऊन हजारो रुपयांचा फटका बसू शकतो.
advertisement
9/9
(टीप: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुमच्या बाईकच्या मॉडेलनुसार आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व्हिसिंग करून घेणे कधीही उत्तम.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike Engine Oil : बाईकचं इंजिन 'जाम' होण्यापूर्वी देते 'हे' 5 संकेत; ऑइल बदलण्याची योग्य वेळ कशी ओळखाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल