TRENDING:

स्कूटरमध्ये मोटरसायकल सारखे गियर का नसतात? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण

Last Updated:
स्कूटरमध्ये मोटरसायकल सारखे गियर का नसतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे नेमकी कोणती टेक्नॉलॉजी आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/10
स्कूटरमध्ये मोटरसायकल सारखे गियर का नसतात? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण
सध्याच्या काळात स्कूटर किंवा स्टूटी शहरांच्या रस्त्यावर सर्वात जास्त धावणारे वाहन ठरले आहे. विशेषतः डेली कम्यूटिंगसाठी लोक स्कूटीवर विश्वास ठेवतात. स्कुटी चालवणे खुप सोपे आहे आणि ऑफिस, दुकान किंवा कॉलेज-शाळेत जाणाऱ्यांसाठी हे सर्वात जास्त सुविधाजनक ठरते.
advertisement
2/10
भारतासारख्या देशात ट्रॅफिक जाम, लहान रस्ते आणि रोजच्या जीवनातील धावपळ ही सामान्य आहे. स्कूटरने बाइकची जागा घेतली आहे. पण प्रस्न निर्माण होतो की, अखेर स्कूटरमध्ये गियर का नसतात. मोटरसायकलमध्ये तर 4,5 किंवा 6 गियर असतात. तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
3/10
गियरच्या जागी काय? : सर्वात आधी जाणून घेऊया की, स्कूटरमध्ये गियरच्या जागी काय असते. जास्तीत जास्त मॉडर्न स्कूटर कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) सिस्टमवर चालतात. ही एक प्रकारची ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. ज्यामध्ये मॅन्युअल गियर नसतात. CVT मध्ये दोन पुली आणि एक बेल्ट असते.
advertisement
4/10
तुम्ही अ‍ॅक्सिलरेटर दाबता तेव्हा इंजिनचा वेग वाढतो तेव्हा ही पुली आपोआप विस्तारते आणि आकुंचन पावते, ज्यामुळे बेल्टची स्थिती बदलते. यामुळे कोणत्याही झटक्याशिवाय गियर रेशोमध्ये सातत्यपूर्ण आणि स्मूद बदल होतात याची खात्री होते. तुम्हाला क्लच दाबण्याची किंवा गिअर्स बदलण्याची गरज नाही; फक्त थ्रॉटल फिरवा आणि चालत राहा.ही सिस्टम स्कूटरच्या डिझाइनशी पूर्णपणे मिळतेजुळते असते. स्टूटर लहान इंजिन (100-150 सीसी) चे असतात. जे शहराच्या कमी स्पीडसाठी तयार केलेले असतेत. मोटरसायकल प्रमाणे हाय स्पीड किंवा मोठ्या अंतरासाठी नाही. CVT लहान इंजिनला कमी RAM वर ठेवते. ज्यामुळे एक्सीलरेशन स्मूद राहते आणि इंधनाची बचतही होते. गियर लावत राहिलात तर स्कूटरचा पूर्ण लूक, वजन आणि मेंटेनेंस वाढते.
advertisement
5/10
गियर का नसतात? : आता प्रश्न उपस्थित होतो की, खरं कारण सुविधा आणि यूझर एक्सपीरियन्स आहे. स्कूटर मुख्यतः महिला, तरुण , सुरुवाती रायडर्स आणि फॅमिली वापरासाठी डिझाइन केल्या जातात. ट्रॅफिकमध्ये प्रत्येक 10-20 मिनिटांवर थांबावं लागतं. गियर असले तर प्रत्येकवेळी क्लच-गियर-एक्सीलेटरचा खेळ खेळावा लागला असता. यामुळे हे खुप त्रासदायक झाले असते.
advertisement
6/10
CVT मुळे रायडर फक्त ब्रेक आणि थ्रॉटलवर फोकस करतात. कोणतेही डिस्ट्रॅक्शन नसते. विशेषतः भारतात जिथे स्कूटर हे महिलांचे आवडते वाहन आहे. ही सविधा गेम चेंजर ठरली आहे. जुन्या काळात वेस्पा सारख्या स्कूटरमध्ये मॅन्युअल गियर असायचे, मात्र 1990-2000 नंतर कंपन्यांनी CVT स्वीकारले कारण बाजाराची मागणी बदलली. आज होंडा अॅक्टिव्हा, टीबीएस ज्यूपिटर, बजाज चेतक सारख्या स्कूटर पूर्णपणे गियरलेस आहेत आणि कोट्यवधी यूनिट विकले आहेत.
advertisement
7/10
CVT किती फायदेशीर? : CVT चे फायदे फक्त सुविधेपर्यंत लिमिटेड नाही. हे मेंटेनेंसही कमी ठेवते. मॅन्यु्ल गियर बॉक्समध्ये चेन, स्प्रॉकेट, क्लच प्लेट्स असतात. ज्या वेळेबरोबर खराब होतात. CVT मध्ये बेल्ट आणि रोलर असतात. जे 20-30 हजार किलोमीटर सहज चालतात.स्मूद एक्सीलरेशनमुळे इंजिनवर कमी ताण पडतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य वाढते. शहरात CVT 40-60 किमी/ताशी वेगाने उत्तम प्रकारे काम करते. हायवेवर 80-90 किमी/ताशी देखील ते ते हाताळू शकते, परंतु स्कूटर स्पोर्ट्स बाईक म्हणून डिझाइन केलेली नाही.
advertisement
8/10
तुलना केल्यास मोटरसायकलमध्ये गियर असतात. कारण ते पॉवरफूल इंजिन (150cc हून वर) असतात. वेगवेगळ्या गियरमुळे हायडरला इंजिनची पॉवर कंट्रोल करण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. पहाडांवर लो गियर आणि हायवेवर हाय गियर, मात्र स्कूटरचा उद्देशच वेगळा आहे. कम्फर्ट, सहज आणि रोजचा वापर.
advertisement
9/10
गियर टाकल्याने काय होतं? : स्कूटरमध्ये गियर टाकले तर त्याची किंमत वाढेल. वजन वाढेल आणि टार्गेट कस्टमर (ज्यांना सोपं हवंय) ते दूरावतील. काही लोक विचार करतात की, गियर नसल्याने कंट्रोल कमी होतो. मात्र सत्य उलट आहे.CVT स्मूद असल्याने ब्रेकिंग आणि बॅलेन्स चांगला राहतो. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गियरचा प्रश्न येत नाही कारण मीटर थेट व्हीलला पॉवर देते. भविष्यात CVT किंवा डायरेक्ट ड्राइव्हच राहील.
advertisement
10/10
निष्कर्ष : स्कूटर गियरलेस हवी कारण ही सुविधा, सुरक्षा आणि शहराच्या ट्रॅफिकसाठी तयार झालेली आहे. CVT टेक्नॉलॉजीने हे संभव केले आहे. ही कोणतीही कमतरता नाही, तर स्मार्ट डिझाइनचा इफेक्ट आहे. तुम्हीही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या, गियर नसणे तुमच्या हायडिंगला सोपे आणि मजेदार बनवेल. पुढच्यावेळी कोणी विचारले की, स्कूटरमध्ये गियर का नसतात. तर सांगा की, CVT ने गियरला जुने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
स्कूटरमध्ये मोटरसायकल सारखे गियर का नसतात? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल