TRENDING:

IND vs NZ : टी-20 वर्ल्ड कप फायनलआधीच ICC ची मोठी घोषणा! 8 पैकी एकाच भारतीयाचं नाव, पाहा कोण?

Last Updated:
T20 World Cup 2026 Player of the Tournament : सध्या सुरू असलेल्या आयसीसी प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आठ नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात फक्त एकाच भारतीयाचं नाव आहे. तर एक पाकिस्तानी खेळाडू आहे.
advertisement
1/7
IND vs NZ : टी-20 वर्ल्ड कप फायनलआधीच ICC ची मोठी घोषणा! 8 पैकी एकच भारतीय
सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा अखेरचा फायनल सामना खेळवला जाईल.
advertisement
2/7
अशातच आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी नामंकनातील आठ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये कोण कोण? पाहा
advertisement
3/7
आयसीसीने शेअर केलेल्या यादीत पाकिस्तानला सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान आहे. तर इंग्लंडच्या विल जॅक्सचा देखील यात समावेश आहे.
advertisement
4/7
त्याचबरोबर साऊथ अफ्रिकेचा स्टार बॉलर लुंगी एन्गिडी, कॅप्टन अॅडम मार्करम यांना नामंकनात स्थान मिळालंय. तर न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रला देखील नाव आयसीसीने शेअर केलंय.
advertisement
5/7
या यादीत युएसएच्या शॅडली व्हॅन शाल्कविक याचं नाव देखील आहे. त्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करत 13 विकेट्स नावावर केल्या होत्या.
advertisement
6/7
तर या यादीत एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे संजू सॅमसन... फक्त चार मॅच खेळून संजूने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी नाव कमावलं आहे. त्यामुळे आता संजू बाजी मारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
7/7
दरम्यान, संजू सॅमसनने 4 मॅचमध्ये 201 च्या स्ट्राईक रेटने 232 धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 7 मॅचमध्ये 383 धावा कोरल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : टी-20 वर्ल्ड कप फायनलआधीच ICC ची मोठी घोषणा! 8 पैकी एकाच भारतीयाचं नाव, पाहा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल