बायको डिवोर्ससाठी कोर्टात, थलापति विजय गर्लफ्रेंडसोबत लग्नमंडपात; PHOTO पाहून चाहते शॉक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
TVK Vijay - Trisha : साऊथ सुपरस्टार थलापति विजयची बायकोनं डिवोर्ससाठी कोर्टात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे थलापति विजय त्याच्या कथित गर्लफ्रेंडबरोबर लग्नमंडपात दिसला. अभिनेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
advertisement
1/9

तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता थलापति विजय यांची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांचा 27 वर्षांचा संसार मोडला आहे. विजयचे प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संगीताने केला आहे.
advertisement
2/9
इतके दिवस या अफवा किंवा निव्वळ चर्चा असाव्यात असं सगळ्यांना वाटत होतं. पण अखेर थलापति विजयच्याबाबतीत या चर्चा खऱ्या ठरल्याचं दिसतंय. अभिनेत्री त्रिशाबरोबर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जात होतं पण तो पहिल्यांदा त्याच्या कथिक गर्लफ्रेंडबरोबर नुकतीच एका लग्नात हजेरी लावताना दिसला. सेम लोकेशन, सेम गाड्या, सेम रंगाचे कपडे दोघांनी परिधान केलेले पाहायला मिळाले.
advertisement
3/9
संगीता गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की ती तिच्या मुलांचे शिक्षण आणि परदेशात काम करण्यासाठी देशात राहत आहे. म्हणूनच तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
advertisement
4/9
घटस्फोटाच्या याचिकेत संगीता म्हणाली, "विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. जेव्हा मला हे कळले तेव्हा मला विजयने विश्वासघात केल्यासारखे वाटले. विजय त्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने मी खूप अस्वस्थ झाले. 2021 मध्ये आम्ही एकाच घरात राहूनही वेगळे राहू लागलो."
advertisement
5/9
संगिताने तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, "विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मला एप्रिल 2021 मध्ये याबद्दल कळले. हे कळल्यानंतरही त्याने दया न करता त्यांचं नातं चालू ठेवलं. यामुळे मला प्रचंड वेदना आणि मानसिक त्रास झाला. हा विश्वासघात आणि वैवाहिक विश्वासाचा भंग आहे. याचा माझ्या मनातवर खोलवर परिणाम झाला."
advertisement
6/9
गेल्या पाच वर्षांपासून तो माझ्यापासून मानसिकदृष्ट्या वेगळा आहे. एका अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या संबंधांमुळे मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. तो म्हणाला की तो तो संपवेल, पण त्याची कृती तशीच राहिली. मी लग्नाचे उल्लंघन करणारे हे नाते तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे विजयने घरातील माझे अधिकार मर्यादित केले आणि माझ्यावर निर्बंधही घातले, असंही संगीताने सांगितलं.
advertisement
7/9
"विजय अभिनेत्रीसोबत परदेशात गेला. अभिनेत्रीने स्वतः सांगितले की ती परदेशात गेली होती. अभिनेत्री अनेकदा विजयसोबत परदेशात जायची आणि तिथे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे, ज्यामुळे मला आणि माझ्या मुलांना प्रचंड मानसिक त्रास होत असे" असंही संगीता म्हणाली.
advertisement
8/9
अभिनेता विजयची पत्नी संगीता हिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे एप्रिलमध्ये सुनावणीसाठी दाखल झालेल्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी होणार आहे.
advertisement
9/9
दरम्यान कलापती अगोरम प्रॉडक्शन कंपनीच्या मालकाचा मुलगा कलापती सुरेश याचा विवाह चेन्नईमध्ये पार पडला. थलापति विजय अभिनेत्री त्रिशासोबत लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला. दोघांनी सेम रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघे एकाच कारमधून उतरले. दोघांनी नवरा नवरीला एकत्र भेटून शुभेच्छा दिल्या. दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बायको डिवोर्ससाठी कोर्टात, थलापति विजय गर्लफ्रेंडसोबत लग्नमंडपात; PHOTO पाहून चाहते शॉक