TRENDING:

photos : वडिलाचं निधन झालं, तरीही खचला नाही, स्वत:ला सिद्ध केलं, आज लोकंही करतायेत कौतुक

Last Updated:
आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी जिद्दीने पुन्हा लढत राहील आणि आपले स्वप्न पूर्ण करत राहीन, याच विचारातून अनेक मुले मुली कठोर परिश्रम करतात आणि शेवटी आपली स्वप्ने एक दिवस नक्की पूर्ण करतात. (धीर राजपूत/फिरोजाबाद, प्रतिनिधी)
advertisement
1/6
वडिलाचं निधन झालं, तरीही खचला नाही, स्वत:ला सिद्ध केलं, आज लोकंही करतायेत कौतुक
ही कहाणी आहे मयंक वर्मा या तरुणाची. वडिलांचे अचानक निधन झाले आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मयंकने या परिस्थितीतही धीर धरत कुटुंबाची जबाबदारी घेतली. यानंतर कठोर परिश्रम करत अगदी काही वर्षात मोठी झेप घेतली आणि त्याची भारतीय नौदलात निवड झाली आहे.
advertisement
2/6
मयंक वर्मा हा उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथील गांधी नगर परिसरातील रहिवासी आहे. लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, ब्रेन ट्यूमरमुळे 2019 मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. यानंतर मयंकने नौसेना डिफेन्स अकादमी येथे प्रवेश घेत तयारी सुरू केली.
advertisement
3/6
या काळात त्याला कोचिंगची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याने काही दिवस बांगडी पॅकिंगचेही काम केले. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती परिस्थिती चांगली नसल्याने त्याने कोचिंग डायरेक्टर माधव शर्मा यांना आपली हकीगत सांगितली. यानंतर त्याचे समर्पण आणि परिश्रम, पाहून कोचिंग सेंटरने त्याची फी माफ केली.
advertisement
4/6
मयंक वर्माने सांगितले की, एक वर्ष कठोर संघर्ष आणि मेहनत केली. आता त्याची निवड भारतीय नौदलात झाली आहे. त्याच्या या यशानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मयंक वर्माने ज्याठिकाणी नौदलाच्या परीक्षेची तयारी केली, त्या नौ सेना डिफेन्स अकादमीचे डायरेक्टर माधव शर्मा यांनी सांगितले की, सुमारे दीड वर्षांपूर्वी मयंक कोचिंगच्या तयारीसाठी याठिकाणी आला होता.
advertisement
5/6
याठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून शारीरिक तयारी सुरू होते आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कोचिंगची तयारी केली जाते. मात्र, मयंक एक दिवस आला आणि म्हणाला की, त्याच्याकडे फीस भरण्यासाठी पैसे नाहीत. तसेच कुटुंबाच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याची मेहनत आणि जिद्द पाहता त्याची फी माफ करण्यात आली.
advertisement
6/6
यानंतर त्याने इंडियन नेवीची परीक्षा पास केली आणि आता तो ट्रेनिंग करुन घरी परतला आहे. त्याच्या या यशामुळे आम्हालाही आनंद झाला आहे. अशा प्रकारच्या सर्व विद्यार्थ्यांची मदत करायला आम्ही नेहमी तयार असू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
photos : वडिलाचं निधन झालं, तरीही खचला नाही, स्वत:ला सिद्ध केलं, आज लोकंही करतायेत कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल