अनेकांनी सांगितलं, 'अप्लाय करू नकोस, अपयश आलं तर निराश होशील', पण तिनं तरुन दाखवलं, सैन्यदलात कॅप्टन झालेल्या महिलेच्या जिद्दीची गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतात प्रत्येक क्षेत्रात आज महिला देशाचे नाव मोठं करत आहेत. शाळेपासून सैन्यदलापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिला आज समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण बनल्या आहेत. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्या भारतीय सैन्यदलात कॅप्टन बनल्या. (विशाल झा/गाझियाबाद, प्रतिनिधी)
advertisement
1/9

कॅप्टन दिनीशा भारद्वाज यांची ही कहाणी आहे. त्यांची भारतीय सैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये निवड झाली होती. त्यावेळी महिलांसाठी सैन्यदलाची नोकरी खूप आव्हानात्मक होती. मात्र, तरीही त्यांनी त्यात यश मिळवले.
advertisement
2/9
बालपणीच डॉ. दिनीशा यांनी भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या लहान असताना एक उडान नावाची एक हिंदी मालिका यायची. ही मालिका पाहून त्यांच्या मनात सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा निर्माण झाली.
advertisement
3/9
त्यांनी ती मालिका पाहिली आणि सैन्यदलातच जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दिनीशा यांच्या कुटुंबात अनेक आव्हाने होती.
advertisement
4/9
दिनीशा यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा पदवीचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा मी पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना भारतीय सैन्यदलात महिला अधिकारी पदासाठी पहिल्यांदाच भरती निघाली होती. त्यावेळी तो अर्ज पाहिला पण त्यावर लक्ष दिले नाही.
advertisement
5/9
शिक्षणासोबत आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी ट्यूशन घ्यायची. तसेच विविध शिक्षण संस्थांमध्येही सहयोग करायची, अशी परिस्थितीत त्यावेळी होती.
advertisement
6/9
फॉर्म काढून भरण्यासाठी अजिबात वेळ नव्हता. यासाठी मी भारतीय सैन्यदलाचा नोंदणी फॉर्म आपल्या हाताने A4 साइज पेपर वर तयार केला होता. तसेच माझ्या विषयाची फक्त एकच जागा होती, ही आणखी एक समस्या होती. त्यात संपूर्ण भारतातून निवड होणार होती.
advertisement
7/9
महिला म्हणून सैन्यदलात भरती होणे, हे खूप कठीण कार्य आहे, असे अनेकांनी सांगितले. तर एकच भरती आहे, पहिलीच नोकरी आहे, निवड झाली नाही तर निराश होशील, त्यामुळे अर्ज करू नको, असेही काही जणांनी सांगितले. मात्र, ही नोकरी माझ्यासाठीच आहे, असे दिनीषा यांच्या मनात होते आणि शेवटी असेच झाले.
advertisement
8/9
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सैन्यदलात जेव्हा ट्रेनिंग घेतात, तेव्हा तुम्ही एक जनरल ऑफिसरची ट्रेनिंग घेतात. सैन्यदलातील एका अधिकाऱ्याप्रमाणे महिला अधिकाऱ्याला ट्रेनिंग देऊन तयार केले जाते.
advertisement
9/9
त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते. वेगवेगळ्या ठिकाणांनुसार त्यांच्या नोकरीचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. आर्मी एज्युकेशनल सेक्टरमध्ये त्यांनी काम केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
अनेकांनी सांगितलं, 'अप्लाय करू नकोस, अपयश आलं तर निराश होशील', पण तिनं तरुन दाखवलं, सैन्यदलात कॅप्टन झालेल्या महिलेच्या जिद्दीची गोष्ट!