जबरदस्त प्लेसमेंटसाठी येथून करा बीटेक! 2 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज; पाहा कसं मिळतं अॅडमिशन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
IIT Roorkee Placement 2024: मॅथ-सायन्स घेऊन 12वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी B.Tech हा सर्वात पसंतीचा ऑप्शन आहे. मात्र कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं हा सगळ्यात मोठा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये नेहमी होतो. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6

आज या सीरीजमध्ये आम्ही तुम्हाला आणखी एका कॉलेजबद्दल सांगणार आहोत. जिथे बी.टेक.मध्ये मजबूत प्लेसमेंट आहे. येथील विद्यार्थ्यांना दोन कोटींहून अधिकचे पॅकेज मिळालेय. येथे जाणून घ्या की एखाद्याला कसे आणि कोणत्या रँकवर प्रवेश मिळतो.
advertisement
2/6
हे कॉलेज Indian Institute of Technology Roorkee आहे. NIRF रँकिंगनुसार, इंजीनियरिंगसाठी हे देशातील 5 वे सर्वोत्तम संस्थान आहे. त्यामध्ये आयआयटी मद्रास पहिल्या, आयआयटी दिल्ली दुसऱ्या, आयआयटी बॉम्बे तिसऱ्या आणि आयआयटी कानपूर चौथ्या स्थानावर आहे.
advertisement
3/6
आयआयटी Roorkee उत्कृष्ट प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील मुलांना लाखो आणि कोटींच्या पॅकेजवर नोकऱ्या मिळतात. 2024 मध्ये प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात IIT Roorkee मध्ये 2.05 कोटी रुपयांचे सर्वोच्च पॅकेज देण्यात आले होते.
advertisement
4/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, IIT Roorkee मध्ये प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 1243 ऑफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. यापैकी 32 ऑफर आंतरराष्ट्रीय आहेत. आतापर्यंत एकूण 281 कंपन्यांनी कॅम्पसला भेट दिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना सरासरी 21.33 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले.
advertisement
5/6
हे टॉप बीटेक कॉलेज असल्याने इथे अॅडमिशन मिळणे सोपे नाही. इतर आयआयटीप्रमाणे येथेही प्रवेश जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेद्वारे होतो. आयआयटी Roorkee मध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. त्यामुळे उच्च पदावर असलेल्यांनाच येथे प्रवेश मिळू शकतो.
advertisement
6/6
IIT Roorkeeसाठी JEE Advanced च्या रँकबद्दल बोलायचे तर, 2023 मध्ये सिव्हिलसाठी येथे शेवटची रँक 7100 होती. तर इलेक्ट्रिकलसाठी 2037 रँक, कॉम्प्युटर सायन्ससाठी 412 आणि मेकॅनिकलसाठी 3845 रँकपर्यंत अॅडमिशन देण्यात आलं. याद्वारे, विद्यार्थी येत्या वर्षांसाठी क्लोजिंग रँकचा अंदाज लावू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
जबरदस्त प्लेसमेंटसाठी येथून करा बीटेक! 2 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज; पाहा कसं मिळतं अॅडमिशन