TRENDING:

बारावीत 99 टक्के, मग MBBS, आता बनला भारतीय सैन्यदलाची शान, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

Last Updated:
भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न लाखो लोक पाहतात. मात्र, खूप कमी जण असतात, ज्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. आज अशा तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी अत्यंत कठोर मेहनत करत भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. (अखंड प्रताप सिंह/लखनऊ, प्रतिनिधी)
advertisement
1/5
बारावीत 99 टक्के, मग MBBS, आता बनला भारतीय सैन्यदलाची शान, तरुणाची प्रेरणादायी..
शाश्वत ज्योतिरादित्य असे या तरुणाचे नाव आहे. तो कानपूर येथील रहिवासी आहे. त्याने पुण्याच्या आर्मी मेडिकल कॉलेज येथून f3 बॅचमध्ये यश मिळवले आहे. यानंतर आता तो भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट डॉक्टरच्या रुपात तैनात होणार आहे. पासिंग आऊट परेड पुण्यातच आयोजित करण्यात आली. याठिकाणी त्याचे आई-वडीलही सहभागी झाले होते.
advertisement
2/5
कानपूर येथील रहिवासी असलेल्या शाश्वत ज्योतिरादित्यच्या या कामगिरीने संपूर्ण शहराचे नाव देशात वाढवले आहे. त्याचे शिक्षण कानपूरातच झाले. सुरुवातीपासूनच त्याला डॉक्टर बनायचे होते. आता त्याची निवड भारतीय सैन्यदलात झाली आहे.
advertisement
3/5
शाश्वतचे वडील व्यावसायिक आहेत. तर त्याची आई विवाह शुक्ला डॉक्टर आहे. तसेच त्या कानपूर येथील कुमारी उद्यान इंटर कॉलेज याठिकाणी शिक्षिका आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितले की, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या कुटुंबात शाश्वत पहिला सदस्य आहे, जो भारतीय सैन्यदलात गेले आहे. यामुळे सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
advertisement
4/5
शाश्वत आता भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण कानपूर येथील सनातन धर्म एज्युकेशन सेंटर कौशलपुरी येथून झाले. 2016 मध्ये दहावीत त्याने 98 टक्के मिळवले होते. तसेच 2018 मध्ये त्याने बारावीच्या परीक्षेत 99.6 टक्के मिळवले. बालपणापासून त्याला डॉक्टर व्हायचे होते. यानंतर त्याने मेडिकलची तयारी सुरू केली होती. 2019 मध्ये नीटची परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी मेडिकल कॉलेज पुणे येथे पुढील शिक्षण घेतले.
advertisement
5/5
त्याने मेडिकल कॉलेज पुणे येथे शिक्षण घेतले तेथून त्यांना आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथे F3 बॅच पूर्ण केल्यानंतर भारतीय सेवांमध्ये पूर्ण कमिशन मिळाले. आता लखनऊच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्याला लेफ्टनंट डॉक्टरची पोस्ट मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
बारावीत 99 टक्के, मग MBBS, आता बनला भारतीय सैन्यदलाची शान, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल