TRENDING:

नवरा मेला पाहिजे म्हणून बायकोनं बेडखाली सोडला साप, कोब्राने 10 वेळा मारला दंश, पण मृत्यूचं कारण वेगळंच!

Last Updated:
एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. नवऱ्याची हत्या करण्यासाठी तिने एक कोब्रा साप हा त्याचा बेडमध्ये सोडून दिला होता.
advertisement
1/7
नवरा मेला पाहिजे म्हणून बायकोनं बेडखाली सोडला साप,कोब्राने 10 वेळा मारला दंश,पण.
मागील काही दिवसांपासून बायकोनं प्रियकराच्या मदतीने पतीच्या खून केलेल्या अनेक घटनांनी समाज मन सुन्न झाला आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. नवऱ्याची हत्या करण्यासाठी तिने एक कोब्रा साप हा त्याचा बेडमध्ये सोडून दिला होता. त्या सापाने त्याला १० वेळ दंश मारला. पण तिच्या नवऱ्याचा सापाच्या दंशामुळे मृत्यू झालाच नव्हता. जे कारण समोर आलं ते ऐकून अख्ख गाव हादरलं.
advertisement
2/7
उत्तर प्रदेश मधील मेरठमध्ये बहसूमा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकबरपूर इथं ही घटना घडली. याच मेरठमध्ये सौरभ राजपूत या तरुणाची मुस्कान नावाच्या बायकोनं हत्या केली होती. त्याच शहरात ही भयानक घटना घडली. अमित कश्यप असं मृत तरुणाचं नाव आहे. तर रविता असं खून करणाऱ्या त्याच्या बायकोचं नाव आहे. रविताचं गावातील अमरदीप नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. नवरा अमित हा दोघांच्या संबंधामध्ये अडथळा येत होता. त्यामुळे अमितचा काटा काढण्याचा दोघांनी प्लॅन केला.
advertisement
3/7
अमित उर्फ मिक्की रविवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. धक्कादायक म्हणजे, त्यांच्या मृतदेहाखाली एक कोब्रा साप दबलेल्या अवस्थेत आढळून आला. अमितच्या शरिरावर सापाने १० वेळा दंश केल्याचं आढळून आलं. त्यामुळे गावकऱ्यांना आणि कुटुंबीयांना वाटलं की सापाच्या दंशामुळे अमितचा मृत्यू झाला. पण कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी पोस्टमार्टमची मागणी केली. पोलिसांनी अमितचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
advertisement
4/7
जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला त्याम्ध्ये अमितचा मृत्यू हा सापाच्या दंशामुळे झालाच नसल्याचं समोर आलं. त्यामुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांना एकच धक्का बसला. अमितचा मृत्यू हा गळा दाबून झाला असल्याचं अहवालात स्पष्ट झालं. त्याचा मृत्यू झाल्यानंतर सापाने त्याला १० वेळा दंश केलं. या बद्दलचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये साप हा अमितला दंश मारत असल्याचं दिसत आहे.
advertisement
5/7
पोलिसांनी घरातील सगळ्यांची चौकशी केली. अखेरीस अमितची बायको रविताला संशयाच्या आधारावर चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने अमितच्या खूनाची कबुली दिली. आपला प्रियकर अमरदीपच्या मदतीने अमितची हत्या केल्याचं रविताने कबूल केलं.
advertisement
6/7
१००० रुपयांमध्ये विकत घेतला कोब्रा साप! - अमरदीप याने शेजारील महमूदपूर सिखेडा गावातून एका गारुड्याकडून १००० रुपयांमध्ये वाइपर कोब्रा जातीचा साप विकत घेतला होता. अमित रात्री घराबाहेर झोपला होता. त्यावेळी अमरदीप आणि त्याची बायको रविताने अमितचा गळा दाबून खून केला. पण अमितचा मृत्यू हा सापाच्या दंशामुळे झाला हे भाषवण्यासाठी त्याच्या मृतदेहाखाली साप सोडून दिला. सापाने अमितला १० वेळा दंश मारला. सकाळपर्यंत साप हा अमितच्या मृतदेहाखाली दबून होता.
advertisement
7/7
गावकऱ्यांनी सांगितलं की, अमरदीपचं अमितच्या घरी कायम ये जा होती. याच दरम्यान, अमरदीप आणि अमितच्या बायकोशी प्रेमसंबंध जुळले. एकावर्षांपासून दोघाचे प्रेमसंबंध जुळले होते. अमितच्या मृत्यूमुळे गावात खळबळ उडाली आहे. बायको रविताच्या कृत्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून तिला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
नवरा मेला पाहिजे म्हणून बायकोनं बेडखाली सोडला साप, कोब्राने 10 वेळा मारला दंश, पण मृत्यूचं कारण वेगळंच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल