आधी नवऱ्याला दिलं विष, नंतर गळा दाबून..., बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं हादरवणारं कांड
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
1/5

कर्नाटक राज्यातील उड्डुपीच्या कार्कला मधील एका महिलेवर आरोप आहे की, तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पत्नीने पतीला आधी विष देत त्याची तब्येत बिघडवली आणि नंतर त्याचा गुदमरून खून केला. उडुपी जिल्ह्यातील कार्कला तालुक्यातील अजेकारे येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बालकृष्ण पुजारी असे 44 वर्षांच्या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीवर त्यांच्या हत्येचा आरोप आहे.
advertisement
2/5
पत्नी प्रतिमाने हळूहळू पतीला विष देत त्याला अशक्त केले आणि उपचाराच्या बहाण्याने घेऊन जाऊन त्याची हत्या केली. प्रतिमाने बाळकृष्णला विष देऊन त्याची प्रकृती बिघडवली आणि नंतर त्यांना रुग्णालयात नेले. मात्र नंतर त्याला घरी आणून त्याचा गळा दाबून खून केला.
advertisement
3/5
मृत बालकृष्ण हे मागील 25 दिवसांपासून ताप, उलटी आणि इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. पत्नीने सांगितले की, पतीला कावीळ झाला होता. तिने त्यांना कार्कला येथील खासगी रुग्णालयात नेले. नंतर त्यांच्यावर मणिपाल येथील केएमसी, बेंगळुरूमधील निम्हान्स आणि मंगळुरू येथील वेलॉक रुग्णालयातही उपचार करण्यात आले.
advertisement
4/5
20 ऑक्टोबर रोजी बालकृष्ण यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बाळकृष्ण यांचा भाऊ रामकृष्ण आणि प्रतिमा यांचा भाऊ संदीप यांनी बाळकृष्ण यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला.
advertisement
5/5
प्रतिमाने आपला भाऊ संदीप याच्यासमोर हत्येची कबुली दिली. दिलीपच्या मदतीने तिने बाळकृष्ण यांचा बेडशीटने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रतिमा आणि तिचा प्रियकर दिलीप यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
आधी नवऱ्याला दिलं विष, नंतर गळा दाबून..., बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं हादरवणारं कांड