'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री, जी आज 50 व्या वर्षीही सिंगल आहे. लग्न न करताच ती आनंदी सिंगल आयुष्य जगत आहे. बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
advertisement
1/7

बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री, जी आज 50 व्या वर्षीही सिंगल आहे. लग्न न करताच ती आनंदी सिंगल आयुष्य जगत आहे. बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने वन नाईट स्टँडची इच्छा व्यक्त केली. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
2/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री आहे, अमीषा पटेल. अलीकडे ती रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या गप्पांमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. कधी करिअरसाठी प्रेम सोडावं लागलं, तर कधी प्रेमासाठी करिअरचा त्याग केला सांगितलं.
advertisement
3/7
अमीषा म्हणाली की आजही तिला लग्नासाठी अनेक प्रस्ताव येतात. पण बहुतेकदा ते प्रस्ताव तिच्या अर्ध्या वयाच्या मुलांकडून येतात किंवा काही लोकांना तिचं लग्नानंतर घरात राहणं आणि चित्रपटांपासून दूर राहणं अपेक्षित असतं. हे तिला मान्य नसल्याने ती अजूनही अविवाहित आहे.
advertisement
4/7
तिने सांगितले की शाळेत असताना देखील ती मुलांचा पाठलाग करायची. ती लहानपणापासूनच खूप रोमँटिक स्वभावाची आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अमीषा एका गंभीर नात्यात होती. तो मुलगा दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित औद्योगिक कुटुंबातून आला होता. पार्श्वभूमी, संस्कार आणि शिक्षण दोघांचे एकसारखे होते. पण जेव्हा अमीषाने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या जोडीदाराने आक्षेप घेतला.
advertisement
5/7
पॉडकास्टमध्ये जेव्हा तिच्या सेलिब्रिटी क्रशबद्दल विचारलं, तेव्हा अमीषाने पटकन टॉम क्रूझचं नाव घेतलं. ती म्हणाली, "लहानपणी माझ्या खोलीत टॉम क्रूझची पोस्टर्स लावलेली असायची. तोच माझा पहिला आणि कायमचा क्रश आहे. जर मला त्याच्यासोबत एक रात्र घालवायची संधी मिळाली, तर मी नक्की होकार देईन."
advertisement
6/7
अमीषाने 2000 मध्ये हृतिक रोशनसोबत "कहो ना... प्यार है" मधून डेब्यू केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अमीषा रातोरात स्टार बनली. त्यानंतर सनी देओलसोबतचा "गदर: एक प्रेम कथा" तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
advertisement
7/7
"हमराज," "ये है जलवा," "आप की खातिर," "भूल भुलैया" सारख्या चित्रपटांतही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. अलीकडेच "गदर 2" ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आणि अमीषाला पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी