34 वर्षांपूर्वीची कल्ट फिल्म, जिने बरबाद केलं अभिनेत्याचं करिअर! वयस्कर हिरोच्या प्रेमात पडली अभिनेत्री, ठरली डिझास्टर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Flop Film : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे असतात जे काळाच्या खूप पुढे असतात. १९९१ मध्ये असाच एक सिनेमा रुपेरी पडद्यावर धडकला, ज्याने त्या काळात खळबळ उडवून दिली होती.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे असतात जे काळाच्या खूप पुढे असतात. १९९१ मध्ये असाच एक सिनेमा रुपेरी पडद्यावर धडकला, ज्याने त्या काळात खळबळ उडवून दिली होती. दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अनिल कपूरचा तो वेगळा अंदाज आणि श्रीदेवीचा अविस्मरणीय अभिनय... हा आहे क्लासिक कल्ट सिनेमा 'लम्हे' (Lamhe).
advertisement
2/8
आज या चित्रपटाला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या या सिनेमाने एका मॉडेलचं करिअर मात्र असं काही उद्ध्वस्त केलं की, त्याला पुन्हा कधीच डोकं वर काढता आलं नाही.
advertisement
3/8
'लम्हे'ची कथा त्या काळासाठी खूपच बोल्ड होती. राजस्थानच्या वाळवंटात फुललेली ही कथा एका अशा तरुणाची (विरेन - अनिल कपूर) होती, जो स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या पल्लवीवर (श्रीदेवी) प्रेम करतो. पण पल्लवी दुसऱ्याशी लग्न करते.
advertisement
4/8
पुढे पल्लवीचा मृत्यू होतो आणि तिची मुलगी पूजा (पुन्हा श्रीदेवी) मोठी झाल्यावर स्वतःच्या वडिलांच्या वयाच्या विरेनच्या प्रेमात पडते. एका प्रौढ हिरोवर एका तरुण मुलीचं प्रेम होणं, हे प्रेक्षकांना त्याकाळी पचलं नाही.
advertisement
5/8
या सिनेमात श्रीदेवीच्या पतीची भूमिका साकारली होती त्या काळातील प्रसिद्ध मॉडेल दीपक मल्होत्रा याने. दीपक दिसायला देखणा होता, पण अभिनयाच्या बाबतीत तो अनिल कपूर आणि श्रीदेवीसमोर पार फिका पडला. चित्रपटात जेव्हा पल्लवीचा अपघाती मृत्यू होतो, तेव्हा दीपकला आरडाओरडा करत तिचं नाव ओरडायचं होतं.
advertisement
6/8
त्याने ज्या पद्धतीने "पल्लो... पल्लो..." असं ओरडत अभिनय केला, त्यावर प्रेक्षकांनी चक्क थिएटरमध्ये शिट्ट्या मारून त्याची खिल्ली उडवली. तो सीन इतका खराब झाला की आजही लोक दीपक मल्होत्राला त्याच एका डायलॉगसाठी ओळखतात.
advertisement
7/8
दीपक मल्होत्राचं नशीब इतकं बलवत्तर होतं की 'लम्हे' रिलीज होण्यापूर्वीच त्याला 'डर', 'जुनून' आणि 'सूर्यवंशी' सारखे मोठे चित्रपट मिळाले होते. पण 'लम्हे' रिलीज झाला आणि दीपकच्या अभिनयाचे वाभाडे निघाले. यश चोप्रा यांनी त्याला आपल्या पुढच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. बघता बघता 'लम्हे'ने दीपकच्या बॉलिवूडमधील स्वप्नांचा चक्काचूर केला. त्यानंतर तो सिनेसृष्टीतून गायबच झाला.
advertisement
8/8
'लम्हे' फ्लॉप झाल्यावर यश चोप्रा खूप खचले होते. त्यांना वाटलं होतं की लोक या आधुनिक कथेला स्वीकारतील, पण तसं झालं नाही. मात्र, आज ३४ वर्षांनंतर हा चित्रपट हिंदी सिनेमातील सर्वात उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो. अनिल कपूरचा तो मॅच्युअर लूक आणि श्रीदेवीने साकारलेला आई-मुलीचा डबल रोल आजही चर्चेचा विषय ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
34 वर्षांपूर्वीची कल्ट फिल्म, जिने बरबाद केलं अभिनेत्याचं करिअर! वयस्कर हिरोच्या प्रेमात पडली अभिनेत्री, ठरली डिझास्टर