TRENDING:

Devkhel सीरीजवर आणखी एक स्फोटक आरोप, 'त्या मराठी अभिनेत्यांनी...' ठाकरेंचा आमदार कडाडला

Last Updated:
Devkhel Series Controversy: सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'देवखेळ' या सीरिजमुळे सध्या कोकणात वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
1/10
Devkhel सीरीजवर आणखी एक स्फोटक आरोप, ठाकरेंचा आमदार कडाडला
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्ग, लाल माती आणि इथली संस्कृती. पण सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'देवखेळ' या सीरिजमुळे सध्या कोकणात वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
2/10
झी ५ वर ही सीरिज ३० जानेवारीला रिलीज झाली खरी, पण त्यातील एका पात्रामुळे कोकणच्या लोकसंस्कृतीचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. आता हा वाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला असून शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी या सीरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
advertisement
3/10
कोकणातील शिमगोत्सवात 'संकासूर' हे पात्र अत्यंत श्रद्धेचं आणि आदराचं मानलं जातं. काळ्या रंगाचा पोशाख आणि विचित्र मुखवटा असला तरी, तो शिवाचा अवतार मानून त्याला आदराने घरात घेतलं जातं.
advertisement
4/10
मात्र, 'देवखेळ'मध्ये हाच संकासूर चक्क सीरिअल किलर म्हणून दाखवण्यात आला आहे. तो पापी माणसांना मारतो, असं चित्रण या सीरिजमध्ये केल्याने कोकणवासीयांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.
advertisement
5/10
आमदार भास्कर जाधव यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना दिलेल्या निवेदनात संताप व्यक्त केला आहे. ते लिहितात, "कोकणातील शिमगा उत्सवातील संकासूर हे एक पारंपारिक, पौराणिक आणि भक्तीमय लोकनृत्य पात्र आहे. काळया रंगाचा पोशाख, विचित्र मुखवटा आणि हातात वेत घेऊन गोमूसोबत घरोघरी फिरणारा संकासूर हा शिवाचा अवतार मानला जातो आणि गावकऱ्यांना आशीर्वाद देतो, हे आपल्याला माहीतच असेल. कारण आपणसुद्धा कोकणातीलच आहात."
advertisement
6/10
भास्कर जाधव यांनी पुढे लिहिलं आहे, "परंतु, झी ५ या मराठी ओटीटीवर ३० जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या 'देवखेळ' नामक वेबसीरिजमध्ये संकासूर खूनी असल्याचे दाखविण्यात आले आहे. या वेबसीरिजचे चित्रीकरण माझ्याच मतदारसंघात गुहागर तालुक्यात सुरू असून सध्या यावरून गुहागरसह संपूर्ण कोकणात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे."
advertisement
7/10
या वादाला आणखी एक गंभीर वळण मिळालं आहे. भास्कर जाधव यांनी असा खळबळजनक दावा केला आहे की, शूटिंगच्या वेळी ग्रामस्थांना सांगण्यात आलं होतं की, आम्ही संकासूरावर डॉक्युमेंटरी करत आहोत.
advertisement
8/10
पण प्रत्यक्षात त्याला विद्रूप रूपात दाखवून कोकणच्या कलेचा अपमान केला गेला. या फसवणुकीमुळे गुहागरसह संपूर्ण कोकणातील नमन आणि भजन मंडळांच्या कलाकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
9/10
कोकणातील कुणबी समाजाने प्रतिकूल परिस्थितीतही नमन आणि संकासुराची कला सातासमुद्रापार नेली आहे. अशा पारंपारिक कलांना बदनाम करणं खपवून घेतलं जाणार नाही, असा पवित्रा लोककलाकारांनी घेतला आहे.
advertisement
10/10
पोलिसांनी यावर कारवाई न केल्याने आता भास्कर जाधव यांनी थेट बंदीची मागणी लावून धरली आहे. कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही सीरिज तात्काळ बंद करावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Devkhel सीरीजवर आणखी एक स्फोटक आरोप, 'त्या मराठी अभिनेत्यांनी...' ठाकरेंचा आमदार कडाडला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल