TRENDING:

ना एकत्र काम, ना कॉमन फ्रेंड्स; कशी झाली सोहम-पूजाची भेट, बांदेकरांच्या लेकाची पाणीपुरीवाली Love Story

Last Updated:
Soham Bandekar - Pooja Birari Love Story : आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी नुकतंच लग्न केलं. दोघे भेटले कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर ज्युनिअर बांदेकरांची लव्ह स्टोरी समोर आली.
advertisement
1/8
कशी झाली सोहम-पूजाची भेट, बांदेकरांच्या लेकाची पाणीपुरीवाली Love Story
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न केलं. दोघांचं लग्न हे मराठी इंडस्ट्री आणि चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज होतं. दोघांची लव्ह स्टोरी पहिल्यांदाच समोर आली आहे.
advertisement
2/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पूजा म्हणाली, "आम्हाला माहिती नाही की आम्ही प्रेमात कधी पडलो." त्यावर सोहम म्हणाला, "झी युवावर ऑलमोस्ट सफळ संपूर्ण नावाची मालिका होती. त्यात पूजाने कॅमियो केला. त्यात डेली एक्सपेन्स देण्याचं काम करत होतो. पण तेव्हा मी तिच्याशी एकदाही बोललो नाही. ती फक्त इनिशिअल इंटरॅक्शन होती."
advertisement
3/8
"मी एक सीरिज केली होती. कोणत्या एरियामध्ये काय मिळतं. मी एक व्हिडीओ टाकला होता. त्यावर पूजाचा रिप्लाय आला की हे कुठे आहे. त्यानंतर दुबईत गेल्यानंतर भाच्याची एक पोस्ट टाकली होती त्यात मागे हिरामंडी वेब सीरिज सुरू होती. त्यावर पूजाने रिप्लाय दिला होता."
advertisement
4/8
"तिच्या प्रोडक्शनवाल्यांनी आईला सांगितलं होतं, पूजा खूप सिन्सियर आहे. वेळेत येते, तिचं पाठांतर चोख आहे. ते माझ्या डोक्यात होतं. ही चांगली मुलगी आहे शांत मुलगी आहे. हे करता करता एक अंदाज आला की पूजाला पाणी पूरी आवडते."
advertisement
5/8
चांगली मैत्री व्हावी वाला झोन होता आणि सोहमने पूजाला पाणीपुरी खायला बोलावलं. सोहम पूजाला ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरला पाणी पुरी खायला घेऊन गेला. त्या अर्धा तासांच्या भेटीत जाणवलं की हे खूप सेम आहे. सोहम म्हणाला, "माझा टाइमपास झोन कुठेच नव्हता. मी आता प्रेमात पडलो कर मला लग्नच करायचं आहे. तीचंही तेच होतं."
advertisement
6/8
"पूजाला भेटून घरी गेलो आणि आईने विचारलं काय सोहम काय खाल्लं, मी म्हणालो पाणी. त्यावर आई मला काहीच बोलली नाही. नंतर मी आईला म्हणालो एकटाच गेलो नव्हतो पूजा होती सोबत. बिरारी बोलल्याबरोबर आई उठून बसली. मी आईला सांगितलं की तुला माहिती पाहिजे म्हणून. आई म्हणाली, बघ हा सोहम मुलगी खूप छान आहे."
advertisement
7/8
त्यानंतर सोहमने वडिल आदेश बांदेकर यांना सांगितलं, तेव्हा ते अमेरिकेत होते. आदेश बांदेकरांनी पूजाला पाहिलं तेव्हाच त्यांना ती आवडली होती. त्यानंतर आदेश बांदेकर यांनी सोहमला पूजाला पटवण्यासाठी फोर्स केला होता. बरेच दिवस सोहम काही म्हणत नव्हता तेव्हा बांदेकरांनी सोहमला सांगितलं की, तू खरा मर्द असशील तर हिच्याकडून होकार मिळवून दाखव.
advertisement
8/8
पूजा म्हणाली, "इंटेट काय आहे हे आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचं होतं आमच्या दोघांसाठी. आपण एखाद्याशी बोलतोय तर आम्ही ना एकत्र काम करत होतो ना एका ग्रुपमध्ये होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलताना आमचा इंटेट आम्हाला खूप क्लिअर होता. त्यामुळे प्रपोजलचीही कधी वेळ आली नाही. हे खूप नॅचरल होतं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना एकत्र काम, ना कॉमन फ्रेंड्स; कशी झाली सोहम-पूजाची भेट, बांदेकरांच्या लेकाची पाणीपुरीवाली Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल