'पालकांसोबत बसून पाहताना...', Toxic चा टॉक्सिक टीझर वादात, साऊथ स्टार यशचं 'ते' जुनं वक्तव्य व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Toxic teaser controversy: या टीझरमधील बोल्ड आणि अश्लील दृश्यांमुळे यशवर चहुबाजूंनी टीका होत असतानाच, त्याच्या एका जुन्या विधानाने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
advertisement
1/7

मुंबई: हॉलिवूडला टक्कर देणारा स्वॅग आणि 'केजीएफ' फेम रॉकी भाई ऊर्फ यश सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निमित्त ठरलंय त्याच्या आगामी 'Toxic' या चित्रपटाचा टीझर.
advertisement
2/7
८ जानेवारीला यशच्या ४० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा टीझर प्रदर्शित करण्यात आला, पण यावरून सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या टीझरमधील बोल्ड आणि अश्लील दृश्यांमुळे यशवर चहुबाजूंनी टीका होत असतानाच, त्याच्या एका जुन्या विधानाने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
advertisement
3/7
'टॉक्सिक'चा टीझर पाहिल्यानंतर कर्नाटकातील आम आदमी पक्षाच्या (AAP) महिला शाखेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या टीझरमधील दृश्यं अश्लील असून ती मुलांवर वाईट परिणाम करू शकतात, असा दावा करत त्यांनी कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
advertisement
4/7
सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहाल्ली यांनीही सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) तक्रार नोंदवली आहे. महिला आयोगाने तर थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून हा टीझर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे.
advertisement
5/7
वाद पेटल्यानंतर सोशल मीडियावर यशची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. 'वीकेंड विथ रमेश' या कार्यक्रमात यशने आपल्या सिनेसृष्टीतील मूल्यांबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता, "मी कधीही पडद्यावर असं कोणतंही दृश्य चित्रित करणार नाही, जे माझ्या पालकांसोबत बसून पाहताना मला अवघडल्यासारखं होईल किंवा मला लाज वाटेल."
advertisement
6/7
यशच्या या विधानामुळे त्याला 'फॅमिली मॅन' आणि 'संस्कारी अभिनेता' म्हणून ओळखलं गेलं. पण आता 'टॉक्सिक'च्या टीझरमधील दृश्यं पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याला त्याच्या तत्त्वांबद्दल विचारणा करत आहेत. जुनं विधान आणि आताची कृती यातील हा विरोधाभास यशला अडचणीत आणणारा ठरत आहे.
advertisement
7/7
गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. यशसोबत या चित्रपटात कियारा आडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे चित्रपटाची भव्यता आणि यशची क्रेझ असली, तरी अश्लीलतेच्या आरोपांमुळे या चित्रपटाच्या ओपनिंगवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पालकांसोबत बसून पाहताना...', Toxic चा टॉक्सिक टीझर वादात, साऊथ स्टार यशचं 'ते' जुनं वक्तव्य व्हायरल