"कुठंय तो नागराज मंजुळे?" शाळेला दांडी मारायची म्हणून गेली अन् सिलेक्ट झाली! रिंकूच्या पहिल्या ऑडिशनचा भन्नाट किस्सा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नागराज मंजुळे आणि रिंकूची पहिली भेट कोणत्याही फिल्मी ड्रामापेक्षा कमी नव्हती. रिंकूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
advertisement
1/7

मुंबई: 'सैराट' ने मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बदलला. या चित्रपटातील 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू आज घराघरांत पोहोचली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या आर्चीची निवड कशी झाली?
advertisement
2/7
नागराज मंजुळे आणि रिंकूची पहिली भेट कोणत्याही फिल्मी ड्रामापेक्षा कमी नव्हती. रिंकूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
advertisement
3/7
रिंकूने 'मित्रम्हणे' या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, जेव्हा नागराज मंजुळे साताऱ्याच्या अकलूजमध्ये नवीन मुलांच्या शोधात आले होते, तेव्हा रिंकू फक्त १३ वर्षांची होती. तेव्हा तिला अभिनयात काडीचाही रस नव्हता.
advertisement
4/7
तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, "आपल्या गावात कुणीतरी मोठा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आलाय, त्याला बघायला जाऊया आणि त्या निमित्ताने शाळेला सुट्टी मारूया." आई-वडिलांसोबत रिंकू नागराजजींना भेटायला गेली खरी, पण तिथे जे घडलं ते तिने कधीच स्वप्नात पाहिलं नव्हतं.
advertisement
5/7
रिंकू जेव्हा ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा तिथे खूप गर्दी होती. एका कॅफेमध्ये ती एका खुर्चीवर बसली. समोर एक साध्या वेशातला माणूस बसलेला तिला दिसला. रिंकूने त्या माणसालाच विचारलं, "कुठं आहे तो नागराज मंजुळे?" समोरच्या माणसाने उत्तर दिलं, "मीच आहे तो, बोल काय काम आहे?"
advertisement
6/7
स्वतः नागराज मंजुळे समोर आहेत हे कळल्यावरही रिंकू डगमगली नाही. त्यांनी तिला विचारलं, "तुला काय येतं?" त्यावर रिंकूने तितक्याच स्पष्टपणे सांगितलं, "मला अभिनयातलं काही येत नाही, फक्त शाळेच्या गॅदरिंगमध्ये 'देवा श्री गणेशा'वर नाचायला येतं." विशेष म्हणजे ते गाणंही अजय-अतुल यांचंच होतं. तिथेच रिंकूने डान्स करून दाखवला आणि नागराज मंजुळेंनी या बिनधास्त मुलीमध्ये आपली आर्ची शोधली.
advertisement
7/7
'सैराट'नंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. 'कागर', 'झुंड', 'मेकअप' आणि 'झिम्मा २' सारख्या चित्रपटांतून तिने स्वतःची ताकद सिद्ध केली. नुकतीच ती 'आशा' या चित्रपटात दिसली होती आणि आता ती 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटात झळकणार असून, तिच्यासोबत अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"कुठंय तो नागराज मंजुळे?" शाळेला दांडी मारायची म्हणून गेली अन् सिलेक्ट झाली! रिंकूच्या पहिल्या ऑडिशनचा भन्नाट किस्सा