TRENDING:

2 संसार मोडले, दोन मुलांना एकटीच सांभळते; वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय तिसरं लग्न!

Last Updated:
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न करायचं आहे. तिसऱ्या लग्नाबद्दल ती काय म्हणाली?
advertisement
1/7
पदरात 2 मुलं अन् वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय तिसरं लग्न?
बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अनेकदा अनेक हिरो आहेत ज्यांनी एक लग्न मोडल्यानंतर दुसरं लग्न केलं. पण अशी एक अभिनेत्री आहे जिला आता तिसरं लग्न करायचं आहे. तिचे दोन संसार टिकले नाहीत. अभिनेत्री दोन मुलांची आहे. वयाच्या 48 व्या वर्षी तिनं तिसऱ्या लग्नाची तयारी केली आहे.
advertisement
2/7
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे दीपशिखा नागपाल. तिनं आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. तिनं मोठ्या पडद्यावर शाहरुख खानसोबत काम केलं.  दीपशिखा सध्या टेलिव्हिजनवर काम करतेय. पण अनेकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार माहिती नाहीये.
advertisement
3/7
स्क्रीनवर नेहमीच आनंदी दिसणाऱ्या दीपशिखाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. तिचे फोटो पाहून आयुष्य किती सुखी आहे असं अनेकांना वाटलं असेल पण वास्तव मात्र काही वेगळंच आहे.  दीपशिखाचा दोन वेळा डिवोर्स झाला आहे.  दोन्ही लग्नांतून तिला दोन मुलं झाली. दीपशिखा तिच्या दोन्ही मुलांचा एकटीनं सांभाळ करतेय.
advertisement
4/7
अलीकडेच KIFF च्या पॉडकास्टमध्ये दीपशिखाने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर बोलली. ती म्हणाली, 'कोयला' आणि 'बादशाह' हे सिनेमे रिलीज होण्याआधीच तिने लग्न केलं होतं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा आई झाली होती. त्याकाळी पीआर आणि करिअरबाबत तिला फार माहिती नव्हती. पीआरबद्दल तिला माहिती असती तर तिने लग्नच केलं नसतं, असं ती म्हणाली.
advertisement
5/7
माझा नवरा कामावर जाईल आणि मी घर सांभाळेन अशी तिची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. मुलं झाल्यानंतर काही वर्षात तिचा पहिली डिवोर्स झाला.
advertisement
6/7
दीपशिखा म्हणाली, "मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगले आहे. जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा केलं. जेव्हा नाही करायचं होतं तेव्हा केलं नाही. मुलं हवी होती म्हणून ती झाली"
advertisement
7/7
दीपशिखा आता 48 वर्षांची आहे. पुढच्या पाच वर्षात काय होईल असं विचारलं असताना दीपशिखा म्हणाली, "कदाचित बॉयफ्रेंड मिळू शकतो किंवा पार्टनरही मिळू शकतो. जर कोणी मिळालं नाही, तरी माझं आयुष्य थांबणार नाही"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 संसार मोडले, दोन मुलांना एकटीच सांभळते; वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय तिसरं लग्न!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल