TRENDING:

Hema Malini Emotional: 'प्रत्येक क्षणी त्यांची आठवण, ते पुन्हा केव्हा भेटणार' धर्मेंद्रंशिवाय आयुष्य अपूर्ण, इमोशनल झाल्या हेमा मालिनी

Last Updated:
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र देओल आज आपल्यात नाहीत. ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. नुकताच लंडनमध्ये पार पडलेल्या बाफ्टा अवॉर्ड शोमध्ये धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या खास क्षणावर हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7
'प्रत्येक क्षणी आठवण, ते पुन्हा केव्हा भेटणार' धर्मेंद्रंच्या आठवणीत हेमा भावुक
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल जरीही आज आपल्यात नसले तरीही ते त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. धर्मेंद्र यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी शेवटचा 'इक्कीस' हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहते त्यांच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत. आता अशातच बाफ्टा अवॉर्ड्स 2026 मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
advertisement
2/7
लंडनमध्ये 'ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2026' हा पुरस्कार सोहळा 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हरायटी इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचं विधान केलं आहे.
advertisement
3/7
हेमा म्हणाल्या की, "धर्मेंद्र एक असे व्यक्ती होते, ज्यांच्यावर जगभरातल्या लोकांनी प्रेम केले आहे. त्यांचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर होता. धर्मेंद्र जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हा ते फार बिझी सेलिब्रिटी होते. त्यामुळे त्यांच्याकडे फार वेळ नसायचा. इतरत्र सेलिब्रिटींसोबत टाईम स्पेंड करता यावा, यासाठी ते प्रत्येक कलाकारासोबत एक चित्रपट साईन करायचे."
advertisement
4/7
पुढे हेमा म्हणाल्या की, "आम्ही दोघेही एकत्र केव्हाच फिरलो नाहीत. आम्हाला फक्त आणि फक्त चित्रपटाच्या सेटवरच एकत्र टाईम स्पेंड करायला मिळायचा. त्यामुळे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत. कारण आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल. मी धर्मेंद्र यांची आजही खूप आठवण काढते. मला कायमच धर्मेंद्र यांची उणिव भासते."
advertisement
5/7
हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला. "मी स्वत: असा प्रश्न उपस्थित करते की, खरोखर धर्मेंद्र आपल्यातून निघून गेलेत का? मी त्यांना पुन्हा केव्हा केव्हा भेटू शकेल?" हेमा यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी 'चुपके चुपके'चं नाव घेतलं. सोबतच मला 'शोले' चित्रपटही फार आवडतो.
advertisement
6/7
धर्मेंद्र यांच्या आठवणीबद्दल हेमा म्हणाल्या की, " मी अनेक चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यासोबतचे अनेक क्षण आजही माझ्या डोळ्यासमोरून जातात. त्यांच्या आठवणींमध्ये धर्मेंद्र यांचे सर्वच चित्रपट मी पाहणार आहे. मी धर्मेंद्र यांचे सर्वच चित्रपट पाहिलेले नाहीत."
advertisement
7/7
दरम्यान, हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 साली लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हा ते विवाहित होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर असून त्यांना चार मुलं आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hema Malini Emotional: 'प्रत्येक क्षणी त्यांची आठवण, ते पुन्हा केव्हा भेटणार' धर्मेंद्रंशिवाय आयुष्य अपूर्ण, इमोशनल झाल्या हेमा मालिनी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल