ऑस्ट्रेलियन वडील, तिबेटीयन आई, आश्रमात गेलं अभिनेत्रीचं बालपण; राज कपूरसोबत दिलेत सुपरहिट चित्रपट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या आयुष्याची स्टोरी ही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये. दिलीप कुमार आणि राज कपूर सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या एका अभिनेत्रीची स्टोरीही एखाद्या पटकथेपेक्षा कमी नाही. या अभिनेत्री वडील आणि तिबेटीयन होती. पण अभिनेत्रीचं संपूर्ण बालपण हे आश्रमात गेलं.
advertisement
1/8

मनात जिद्द असेल तर ठरवलेली प्रत्येक गोष्ट करता येते. तिबेटमध्ये जन्मलेली आणि दार्जिलिंगमध्ये वाढलेली ही अभिनेत्री मुंबईत आली आणि रुपेरी पडद्यावर आपल्या कामगिरीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने सिनेमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली पण तिच्या खऱ्या आयुष्याची स्टोरी ऐकली तर त्यावरही एखादा सिनेमा तयार होईल अशी आहे.
advertisement
2/8
60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री लतिका हिच्याबद्दल आपण बोलत आहोत. अभिनेत्रीचं खरं नाव हे हांगू ल्हामू होतं. तिचे वडील ऑस्ट्रेलियन होते आणि तिची आई तिबेटीयन होती. या अभिनेत्रीने बालपणातच तिच्या वडिलांना गमावले. आईने दुसरं लग्न करण्यासाठी अभिनेत्रीला लहान वयात अनाथाश्रमात सोडून दिलं.
advertisement
3/8
अभिनेत्री लतिका एका स्कॉटिश मिशनरी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली. जिथे तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. अभिनेत्री लतिकानं तिच्या आयुष्यातील मोठा काळ या आश्रमात घालवला. तिच्या सावत्र वडिलांची मुंबईत बदली झाल्यावर तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. ती आई वडिलांबरोबर मुंबईत शिफ्ट झाली.
advertisement
4/8
लतिकाने कधीच अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. परंतु तिची शेजारी एक कथक नृत्यांगना होती. ती लतिकाला मोठ्या पडद्यावर पाहू इच्छित होती. तिच्या आग्रहावरून लतिका हिरोईन बनली आणि मोठ्या पडद्यावर झळकली.
advertisement
5/8
एके दिवशी लतिका त्याच नर्तिकेसोबत मिनर्वा स्टुडिओमध्ये गेली. तिथे तिची भेट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सोहराब मोदी यांच्याशी झाली. मोदी हे 1930 - 1960 च्या दशकात इंडस्ट्रीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.
advertisement
6/8
दिग्दर्शक आणि निर्माता सोहराब मोदी यांनी तिचे नाव बदलून लतिका असं ठेवलं जेणेकरून तिला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळू शकेल. लतिकाने त्यांच्या 1944 साली आलेल्या 'परख' सिनेमातून डेब्यू केला.
advertisement
7/8
त्यानंतर तिने 1948 साली तिने राज कपूर यांच्याबरोबर 'गोपीनाथ' या सिनेमात काम केलं. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कौल यांनी केलं होतं.
advertisement
8/8
काही वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री लतिकाने लोकप्रिय विनोदी कलाकार गोपेशी लग्न केलं. अभिनेत्री लतिकाने ग्लॅमर जगापेक्षा प्रेमाला प्राधान्य दिलं. लग्नानंतर अभिनय क्षेत्र कायमचं सोडून दिलं. ही अभिनेत्री आज 100 वर्षांची आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑस्ट्रेलियन वडील, तिबेटीयन आई, आश्रमात गेलं अभिनेत्रीचं बालपण; राज कपूरसोबत दिलेत सुपरहिट चित्रपट