TRENDING:

Actress Serious Allegations: 'दारुच्या नशेत मला जबरदस्ती KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप

Last Updated:
Actress Serious Allegations: सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करताना अनेक कलाकारांना वाईट अनुभव येतात. खास करुन अभिनेत्रींना. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन कास्टिंग काऊचचला अनुभव शेअर केला.
advertisement
1/7
'दारुच्या नशेत मला KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप
सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करताना अनेक कलाकारांना वाईट अनुभव येतात. खास करुन अभिनेत्रींना. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन कास्टिंग काऊचचला अनुभव शेअर केला.
advertisement
2/7
आता आणखी एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासे केलेत ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने प्रसिद्ध डायरेक्टरवर जबरदस्ती किस करण्याचा आरोप केलाय.
advertisement
3/7
वेब सिरीज मस्तराम आणि रिअॅलिटी शो हाऊस अरेस्ट मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नेहल वडोलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण वेगळं आहे. नेहलने केलेल्या खुलाशाने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.
advertisement
4/7
नेहलच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत (जो सुभाष घई यांचा मॅनेजर देखील आहे) घईंच्या घरी गेली होती. सुरुवातीला वातावरण सामान्य होतं. त्यावेळी तिला रेड वाईन देण्यात आली. संभाषण सुरू असताना दिग्दर्शक सतत तिचं कौतुक करू लागले, "तुझं स्मित सुंदर आहे... तू खूप सेक्सी आहेस... बॉलिवूडमध्ये मोठं नाव होईल..." सुरुवातीला हे ऐकून छान वाटलं, पण हळूहळू वातावरण अस्वस्थ झालं.
advertisement
5/7
नेहल सांगते, "त्यांनी मला बाल्कनीत बोलावलं, पण मी नकार दिला. मग वॉशरूममधून बाहेर आले, तेव्हा ते अचानक माझ्यासमोर आले. त्यांच्या डोळ्यात नशा होती आणि ते इतके जवळ आले की त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या गालाला झाला. मला वाटलं की ते माझ्या ओठांवर किस घेणार आहेत."
advertisement
6/7
या घटनेनंतर नेहल संतापली. तिने आपल्या बॉयफ्रेंडलाच प्रश्न केला, "तू मला इथे का आणलंस? तुला माहीत होतं ना हे सगळं?" या घटनेनंतर नेहलने त्याच्यावरचा विश्वास गमावला आणि नातं संपवलं.
advertisement
7/7
नेहल वडोलिया तिच्या बोल्ड लुक्स आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखली जाते. तिने मस्तराम, फुलझाडी, जलेबी बाई यांसारख्या वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. तिच्या ग्लॅमरस स्टाईलने तिला वेगळी ओळख मिळाली. पण आता तिच्या या धक्कादायक कबुलीजबाबामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Serious Allegations: 'दारुच्या नशेत मला जबरदस्ती KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल