IND vs PAK : '40 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं', मराठी अभिनेत्यानं वडिलांना थेट दुबईत दिलं खास सरप्राइज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. खास फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
advertisement
1/7

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आशिया कप 2025 चा सामना चांगलाच रंगला. टीम इंडियानं फायनलमध्ये बाजी मारली आणि नवव्यांदा आशिया कप आपल्या नावे केला. हा सामना सगळ्यांसाठी महत्त्वाचा होता. सगळेच टीव्हीकडे डोळे लावून बसले होते.
advertisement
2/7
प्रसिद्ध मराठी अभिनेता तर ही मॅच राहण्यासाठी थेट दुबईत पोहोचला होता. तो जाताना एकटा नाही तर सोबत भाऊ आणि वडिलांना घेऊन गेला होता. अभिनेत्याने या निमित्तानं त्याच्या वडिलांचं 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं.
advertisement
3/7
प्रसिद्ध अभिनेता, डान्सर मयुरेश पेम त्याचा भाऊ मनमीत पेम आणि वडील देवेंद्र पेम यांच्याबरोबर दुईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला गेले होते. त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा ठरला.
advertisement
4/7
मयुरेशनं सामन्यातील फोटो शेअर करत वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं, "ड्रिम कम्स ट्रू, माझे बाबा मोठे क्रिकेटप्रेमी आहेत आणि त्यांचं आजीवन स्वप्न होतं की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहावा."
advertisement
5/7
"योगायोग असा झाला की माझा शो दुबईत होता आणि त्याच दिवशी हा सामना खेळला जात होता. ही संधी मी हुकवूच शकत नव्हतो!"
advertisement
6/7
"मी त्यांना सरप्राइज देत तिकीटं दिली आणि त्यांचं तब्बल 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं. असे क्षण खरोखरच अमूल्य असतात."
advertisement
7/7
देवेंद्र पेम हे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांची दोन्ही मुलं, मयुरेश पेम आणि मनमीत पेम यांनीही अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. दोन्ही भाऊ सध्या वडिलांच्याच 'ऑल द बेस्ट' या नाटकात काम करतात. याच नाटकाचा प्रयोग दुबईत होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IND vs PAK : '40 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं', मराठी अभिनेत्यानं वडिलांना थेट दुबईत दिलं खास सरप्राइज