अभिनेत्रीने पळून जाऊन केलं लग्न, कुटुंबाविरोधात जाऊन बनली मुख्यमंत्र्याची दुसरी बायको!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Radhika Kumaraswamy Untold Story: सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या हटके लव्हस्टोरीमुळे चर्चेत आहेत. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया जी घरच्यांच्या विरोधात गेली आणि मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको बनली.
advertisement
1/7

प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेत्री राधिका कुमारस्वामीचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिलं आहे. ज्याचा परिणाम तिच्या चित्रपट कारकिर्दीवरही झाला.
advertisement
2/7
अभिनेत्री राधिका कुमारस्वामी कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वयाच्या 14 व्या वर्षी 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'निनागी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आपल्या चमकदार अभिनयाने दक्षिण चित्रपटसृष्टीत एक जबरदस्त ठसा उमटवला.
advertisement
3/7
38 वर्षांची राधिका आता निर्माती आहे आणि तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि आनंदी आयुष्य जगत आहे. तिने 2012 मध्ये पहिल्यांदा 'लकी' चित्रपटाची निर्मिती केली होती. तिने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
4/7
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडवून दिली. राधिका कुमारस्वामी यांच्यापेक्षा जवळपास 27 वर्षांनी लहान आहे. 2006 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. राधिका आणि कुमारस्वामी या दोघांचंही हे दुसरे लग्न होतं.
advertisement
5/7
राधिकाच्या वडिलांना आपल्या मुलीने कुमारस्वामीसोबत लग्न करावं असं वाटत नव्हतं, पण राधिकाने त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, असं म्हटले जातं. दोघांनीही आपलं लग्न अगदी गुपित ठेवलं होतं. अभिनेत्रीच्या या लग्नामुळे तिच्या वडिलांना चांगलाच धक्का बसला होता.
advertisement
6/7
दरम्यान, अभिनेत्रीचे पहिले लग्नही चर्चेत राहिलं होतं. 2000 मध्ये राधिकाने रतन कुमार नावाच्या व्यक्तीसोबत पळून जाऊन मंदिरातलग्न केले होतं, त्यानंतर 2002 मध्ये रतन कुमार यांनी राधिकाचे वडील देवराज यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने राधिकावर अपहरणाचा आरोप केला होता.
advertisement
7/7
या रिपोर्टमध्ये रतनने सांगितले होते की, राधिकाचे करिअर बरबाद होण्याच्या भीतीने राधिकाचे वडील तिला सोबत घेऊन गेले होते. त्यानंतर राधिकाच्या वडिलांनीही रतन कुमारने आपल्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी राधिकाच्या आईनेही रतन कुमारवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, 2002 मध्ये रतन कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्रीने पळून जाऊन केलं लग्न, कुटुंबाविरोधात जाऊन बनली मुख्यमंत्र्याची दुसरी बायको!