नेसली साडी, हातात भरला हिरवा चुडा! तरुणांची क्रश रितिका श्रोत्री करतेय लग्न? PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ritika Shrotri Wedding : 'बॉइज' फेम अभिनेत्री रितिका श्रोत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात तिने हातात चुडा भरला आहे.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वात लगीन सराई अगदी जोमात सुरू आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा कलाकारांच्या लग्नानांनी गाजवला. पूजा बिरारी - सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड,सूरज चव्हाण सारख्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली.
advertisement
2/9
अशातच आता आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील लाखो दिलो की धडकन असलेली रितिका श्रोत्रीनं घरातील लगीन घाईचे फोटो शेअर केलेत.
advertisement
3/9
'बॉइज', 'बॉइज 4', 'डार्लिंग', 'लंडन मिसळ', 'टकाटक', 'रेड 2', 'बोंबिलवाडी' सारख्या मराठी तसंच हिंदी सिनेमांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री लग्न करतेय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
4/9
रितिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात तिनं साडी नेसली आहे आणि तिच्या हातात हिरवा चुडा भरला आहे. घरी चुडा भरण्याचा कार्यक्रम देखील पाहायला मिळाला आहे.
advertisement
5/9
या फोटोनंतर रितिका श्रोत्री लग्न करतेय अशा चर्चा सुरू झाल्या आहे. या चर्चांमुळे रितिकाच्या फॅन्सना सुखद धक्का बसला आहे. खरंच ती लग्न करतेय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
6/9
रितिकानं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं लोखांची मनं जिंकली. ती तरुण वर्गात प्रचंड फेमस आहे. सोशल मीडियावर देखील तिचं जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
advertisement
7/9
लाखो दिलो की धडकन असलेल्या रितिका श्रोत्रीचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. या फोटोविषयी सांगायचं झाल्यास, रितिका श्रोत्रीच्या घरी लगीन घाई आहे पण लग्न तिचं नाही तर तिच्या मोठ्या भावाचं आहे.
advertisement
8/9
रितिकाच्या मोठ्या भावाचं लग्न असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. चुडा भरणे आणि ग्रहमखाच्या कार्यक्रमाचे फोटो रितिकाने शेअर केलेत. 'दादाचं लग्न डे 1' असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं आहे.
advertisement
9/9
रितिकाची पोस्ट वाचल्यानंतर तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. रितिका नाही तर तिच्या भावाचं लग्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नेसली साडी, हातात भरला हिरवा चुडा! तरुणांची क्रश रितिका श्रोत्री करतेय लग्न? PHOTO