Esha Dey Wedding : आज शब्द अपुरे पडतील! ईशा डेचं लग्न अन् इमोशनल झाली अभिनेत्री मैत्रीण, खूप खूप खूप रडली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Esha Dey Wedding : अभिनेत्री ईशा डेचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर सासरी निघालेल्या ईशाला निरोप देताना तिची लाडकी मैत्रीण खूप इमोशनल झाले. दोघींचे हे इमोशनल क्षण कॅमेरात कैद झालेत.
advertisement
1/8

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री ईशा डेचं नुकतचं लग्न झालं. ईशाने गीतकार असलेल्या अभिषेक खणकरबरोबर लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/8
ईशाने अचानक लग्नाची बातमी देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. चाहत्यांनी देखील ईशाचं अभिनंदन करत तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
advertisement
3/8
ईशाच्या लग्नासाठी मनोरंजन विश्वातील काही मोजक्या मंडळींनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील प्रियदर्शनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, समीर चौघुले, सचिन गोस्वामी यांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
advertisement
4/8
त्याचबरोबर अभिनेते मकरंद देशपांडे आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार देखील आले होते. लग्न करून ईशा खणकरांची सून झाली. सासरी चाललेल्या ईशाला निरोप देताना तिची हक्काची मैत्रीण मात्र खूप खूप इमोशनल झाली.
advertisement
5/8
'हे मन बावरे' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सायली परब शेलार देखील ईशाच्या लग्नात होती. सायली ईशाची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. ईशाच्या ग्रहमखाचे फोटो देखील तिनेच पहिल्यांदा शेअर केले होते.
advertisement
6/8
लग्नानंतर माहेर चाललेल्या ईशाला पाहून सायलीला रडू आवरलं नाही. ईशाला मिठी मारून सायली खूप रडली. ही इमोशनल मुमेंट कॅमेरात कैद झाली आहे.
advertisement
7/8
सायलीने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, आज शब्द अपुरे पडतील... खूप प्रेम ईशा. फोटोमध्ये दोघींचं प्रेम आणि डोळ्यातील आनंदाश्रू स्पष्टपणे दिसत आहेत.
advertisement
8/8
सायलीच्या या पोस्टवर ईशाने देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. ईशाने लिहिलंय, "तू माझ्यासाठी एक भक्कम आधार राहिला आहेस. आय लव्ह यू सो मच."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Esha Dey Wedding : आज शब्द अपुरे पडतील! ईशा डेचं लग्न अन् इमोशनल झाली अभिनेत्री मैत्रीण, खूप खूप खूप रडली