TRENDING:

अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरानेही कंन्फर्म केलं Breakup! सांगितलं तिचं Relationship Status

Last Updated:
गेल्या महिन्यात सिंघम अगेनच्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटातील स्टार्सनी एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता, “मी आता सिंगल आहे.”
advertisement
1/9
अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरानेही कंन्फर्म केलं Breakup!
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडपं होतं. मात्र, हे जोडपं आता वेगळं झालं आहे. बऱ्याच काळापासूनच अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या.
advertisement
2/9
अनेक इव्हेंटमध्ये ते पूर्वीसारखे एकत्रही दिसत नव्हते. त्यातच, काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो सिंगल असल्याचं सांगितलं. यावर मलायकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता तिने तिचं रिलेशनशिप स्टेटस सर्वांना सांगितलं आहे.
advertisement
3/9
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. काही वेळाने मलायकाने एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली.
advertisement
4/9
अनेक पार्ट्या आणि व्हेकेशन्समध्ये दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या होत्या, ज्याला अर्जुन कपूरने स्वतः दुजोरा दिला.
advertisement
5/9
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं संपल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र, दोघांनीही याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते.
advertisement
6/9
गेल्या महिन्यात ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटातील स्टार्सनी एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता, “मी आता सिंगल आहे.”
advertisement
7/9
दरम्यान, या घटनेच्या जवळपास महिनाभरानंतर मलायकाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते कन्फ्युज झाले आहेत.
advertisement
8/9
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात लिहिलंय, "या क्षणी माझं रिलेशनशिप स्टेटस." याखाली तीन पर्याय दिले आहेत. ते पर्याय असे आहेत की, "इन रिलेशनशिप, सिंगल आणि हिहीही."
advertisement
9/9
यावेळी मलायकाने शेवटच्या पर्यायावर म्हणजेच 'हीहीही' वर टिक केली आहे. मलायकाने सोशल मीडियावरील एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. मात्र, स्वतः याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरानेही कंन्फर्म केलं Breakup! सांगितलं तिचं Relationship Status
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल