Akshay Kumar Fitness : सातच्या आत जेवण, सोमवारचा उपवास; फिटनेससाठी खिलाडी कुमार आणखी काय काय फॉलो करतो?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshay Kumar Fitness Routine : रात्री लवकर जेवण करणं, सोमवारी उपवास करणं, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून अक्षय कुमार आपलं फिटनेस सांभाळतो.
advertisement
1/7

अक्षय कुमार बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या शिस्तबद्ध लाइफस्टाईलसाठी तो ओळखले जातो.
advertisement
2/7
अक्षय कुमार नियमितपणे रात्री 10 वाजेपर्यंत झोपतो, उशिरा होणाऱ्या पार्ट्यांपासून तो दूर राहतो आणि तो नेहमी प्रयत्न करतो की संध्याकाळी 7 वाजण्याआधी त्याचं जेवण झालेलं असेल.
advertisement
3/7
अक्षय कुमार म्हणतो,"रात्रीचं जेवण लवकर करणं गरजेचं आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण रात्री झोपायला जातो, तेव्हा आपल्या डोळ्यांना आराम मिळतो, आपले पाय आरामात असतात, हातही आरामात असतात, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आरामात असतो. पण जर आपण उशीर जेवण केलं तर पोटाला आराम करता येणार नाही".
advertisement
4/7
अक्षय कुमारचा सोमवारी कडम उपवास असतो. सोमवारी फक्त उपवासाला चालणारे पदार्थ आणि फळं खिलाडी खातो.
advertisement
5/7
अक्षय कुमार रॉक क्लाइम्बिंग करतो. वजन उचलणाऱ्या गोष्टी तो जीममध्ये करत नाही. तर फक्त साध्या पद्धतीने वर्कआऊट करतो.
advertisement
6/7
अक्षय कुमार दररोज 6:30 वाजता जेवण तरतो. त्यामुळे आज अनेक आजारांपासून तो दूर आहे.
advertisement
7/7
अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या त्याचा 'जॉली एलएलबी 3' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना आता 'हेरा फेरी 3'ची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshay Kumar Fitness : सातच्या आत जेवण, सोमवारचा उपवास; फिटनेससाठी खिलाडी कुमार आणखी काय काय फॉलो करतो?