5 वर्ष 1750 एपिसोड अन् प्रेक्षकांचं भरभरून प्रेम; मग अक्षय मुदवडकरने का सोडली 'जय जय स्वामी समर्थ' मालिका?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Why did Akshay Mudwadkar Left Jai Jai Swami Samarth Serial : अभिनेता अक्षय मुदवाडकरने 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका का सोडली असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला होता. अखेर त्यानेच याचं उत्तर दिलं.
advertisement
1/8

काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून असतात. त्यातील एक मालिका म्हणजे जय जय स्वामी समर्थ. या मालिकेत मोठा बदल झाला आहे.
advertisement
2/8
मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारा अभिनेता बदलण्यात आला आहे. अभिनेता अक्षय मुदावडकरऐवजी आता मालिकेत अभिनेते सुनील गोडसे स्वामींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
3/8
दरम्यान अक्षय मुदवाडकरने स्वामींची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. तब्बल 5 वर्ष तो मालिकेत काम करत होता. इतक्या वर्षात तब्बल 1750 एपिसोड त्याने केले. तरी देखील अक्षय मुदावडकरने जय जय स्वामी समर्थ मालिका का सोडली?
advertisement
4/8
चाहत्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर स्वत: अक्षय मुदावडकरने दिलं आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "नमस्कार, गेली 5 वर्षे आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली याकरता मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो."
advertisement
5/8
"त्याचबरोबर तुम्ही रसिक प्रेक्षकांनी गेली पाच वर्षे भरभरून प्रेम दिलं त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण ज्याप्रमाणे एखादा प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. याचप्रमाणे माझासुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता."
advertisement
6/8
"हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास माझ्यासाठी कायम स्पेशल असेल. भविष्यात जरी मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल."
advertisement
7/8
अक्षय पुढे म्हणाला, "पुन्हा एकदा मी तुम्हा रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनी आणि निर्मात्यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली म्हणून मला ही भूमिका साकारता आली.यापुढे आपली भेट जरी मालिकेतून होणार नसली तरीसुद्धा मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर अँक्टिव्ह आहे. माझ्या पुढच्या सगळ्या अपडेट्स मी तिथे देत राहिन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार."
advertisement
8/8
मालिकेत आता स्वामींचा महानिर्वाण प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे मालिकेची कथा देखील बदलत आहेत. त्यामुळेच अक्षय मुदावडकरऐवजी अभिनेते सुनील गोडसे यांची स्वामींच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
5 वर्ष 1750 एपिसोड अन् प्रेक्षकांचं भरभरून प्रेम; मग अक्षय मुदवडकरने का सोडली 'जय जय स्वामी समर्थ' मालिका?